
ठाणे : दोन तरुणांमध्ये झालेल्या हाणामारीत शिवम करोतिया या 20 वर्षीय तरुणांची पाठीत वार करून चाकू घोपसून हत्या करण्यात आली आहे.

तनिष नावाच्या 21 वर्षीय तरुणाने ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सध्या हल्लेखोर तरुण फरार झाला आहे.

तनिष याने केलेल्या हल्ल्यात मयत शिवम याच्या शरीरात चाकू एका भागात अडकल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

अधिकच्या तपास वागळे पोलीस ठाणे करत असून फरार आरोपीचा शोध चालू आहे.