एक सुंदर मोलकरीण, जी आपल्या श्रीमंत मालकासोबत…, OTT वरील या चित्रपटाचा प्रत्येक सीन थक्क करणारा

एका कठीण परिस्थितीतून आलेली तरुणी, जी एका श्रीमंत कुटुंबात लिव्ह-इन मोलकरीण म्हणून काम करते. पण पुढे जे होतं ते पाहून तुमचे देखील डोकं चक्रावेल.

| Updated on: Mar 19, 2026 | 9:27 AM
1 / 6
'द हाउसमेड' हा सिडनी स्वीनी आणि अमांडा सेफ्राइड याचा प्रमुख भूमिका असलेला अमेरिकन इरोटिक सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आता Amazon Prime Video वर 19 मार्च 2026 पासून प्रदर्शित होत आहे.

2 / 6
हा चित्रपट डिसेंबर 2025 मध्ये थिएटरमध्ये रिलीज झाला होता आणि जगभरात त्याने मोठी कमाई करत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटाची कथा Freida McFadden यांच्या 2022 च्या कादंबरीवर आधारित आहे.

3 / 6
कथानकात मिली कॅलोवे (सिडनी स्वीनी) ही तरुणी हत्या प्रकरणात शिक्षा भोगल्यानंतर जामीनावर बाहेर येते आणि नीना विनचेस्टर (अमांडा सेफ्राइड) यांच्या घरी लिव-इन मेड म्हणून काम सुरू करते. सुरुवातीला सगळं सामान्य वाटत असलं तरी हळूहळू त्या कुटुंबातील भयानक आणि गूढ रहस्ये समोर येऊ लागतात.

4 / 6
नीनावर मानसिक आजाराचे आरोप, मुलीला मारण्याचा प्रयत्न आणि आत्महत्येचा प्रयत्न अशा घटना उलगडत जातात. दुसरीकडे, मिली आणि नीनाचा पती अँड्र्यू यांच्यात जवळीक वाढते. मात्र नंतर उघड होते की अँड्र्यू अत्यंत क्रूर असून तो नीनावर मानसिक आणि शारीरिक अत्याचार करत असतो.

5 / 6
कथा पुढे जाताना सत्य आणि खोटं यामधील सीमारेषा धूसर होते. मिली स्वतःच्या भूतकाळाशी आणि वर्तमानातील धोकादायक परिस्थितीशी झुंज देताना दिसते. अखेरीस अँड्र्यूचा मृत्यू आणि पोलिस तपासामुळे कथेत मोठा ट्विस्ट येतो.

6 / 6
या सस्पेन्स, थ्रिल आणि धक्कादायक क्लायमॅक्समुळे हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत एका जागेवर खिळवून ठेवतो. हा चित्रपट OTT वर पाहण्यासाठी एक उत्कृष्ट थ्रिलर चित्रपट मानला जात आहे.

Follow Us