
अमरावती शहरातील दस्तुरनगर भागातील जीवनज्योती कॉलनीमध्ये राहणाऱ्या प्रशांत देशमुख यांच्या अभियंता कन्येचा विवाह होणार आहे. तत्पूर्वी गुरुवारी सायंकाळी देशमुख कुटुंबियांनी एकुलत्या एक वधुची घोड्यावरून वाजत-गाजत मिरवणूक काढली. ही मिरवणूक परिसरात चांगलीच उत्सुकतेचा विषय ठरली होती.

प्रॉपर्टी व्यावसायिक असलेल्या प्रशांत आनंदराव देशमुख यांना एकुलती एक वैष्णवी ही कन्या आहे. वैष्णवीने अभियांत्रिकीची पदवी घेतली असून, तिचा खामगाव येथील अभियंता युवकासोबत विवाह शनिवारी शहरातच होणार आहे.

वैष्णवी या घोड्यावर बसल्यानंतर अगदी खूष दिसत आहेत. घोडा अधिक सजवला असून तो मालकाच्या आदेशानुसार काम करीत आहे. परिसर अगदी सजवला असून वेगळवेगळ्या पध्दतीचे लाईट देखील लावण्यात आले आहेत. मिरवणुकीला उपस्थित पाहुणे डान्स करीत आहेत.

दरम्यान, घोड्यावर बसण्याची वैष्णवीची इच्छा होती तसेच वडील प्रशांत व आई शिल्पा यांनीसुद्धा मुलीमध्ये मुलाला पाहिले असल्यामुळे हा निर्णय घेतला होता.मुलगा-मुलगी असा भेद आम्ही पाळत नाहीत.

मुलगा असता तर त्याची लग्नाच्यावेळी घोड्यावर बसवून मिरवणूक काढलीच असती. मात्र, मला मुलगा नाही, अशावेळी आम्ही आमच्या मुलीलाच मुलाच्या जागी पाहतो आणि तिची सुद्धा घोड्यावरून जल्लोषात मिरवणूक काढण्याचे ठरवले होते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.