
भटकंती करणे हे प्रत्येकालाच आवडते. दैनंदिन जीवनात, शारीरिक किंवा मानसिक थकव्यात प्रत्येकजण काही क्षण विश्रांतीसाठी शोधत असतो. विशेषत: परदेशात जाण्याचा मोह असलेले भारतीय परदेश प्रवास खूप महाग असल्याचं समजतात. मात्र हे खरं नाही.

अनेकदा लोक डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाकडे पाहतात आणि आपल्या चलनाला कमकुवत मानतात. मात्र असे बरेच देश आहेत जेथे भारतीय रुपयाचं मूल्य खूप जास्त आहे. अशा देशांमध्ये आपण स्वत:ला श्रीमंत समजू शकतो. अशा देशांमध्ये प्रवास करणं खूप स्वस्त आहे.

दक्षिणेस भारताच्या शेजारी असलेला देश म्हणजेच श्रीलंका. दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक सहभाग आहे. जर आपल्याला सुंदर समुद्र किनारे आणि जंगल पर्वतरांना याचा विलक्षण अनुभव घ्यायचा असेल तर हा देश फिरण्यासाठी परिपूर्ण आहे.

व्हिएतनाम देखील भेट देण्यासाठी एक सुंदर देश आहे. इथल्या चलनाला डोंग म्हणतात. येथे भारतीय 1 रुपयाची किंमत 316.22 डोंग आहे. हा देश सुंदर लोकल आणि स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध आहे. इथेही तुम्हाला श्रीमंत असल्या सारखं वाटेल.

इंडोनेशियात, बेटांच्या समूहात आपल्याला प्राचीन भारतीय देवतांची मंदिरं सापडतील. येथे तुम्हाला 197.72 इंडोनेशियन रुपये 1 भारतीय रुपयाला मिळतील. इंडोनेशिया प्रवास खूप स्वस्त ठरू शकतो.

'दक्षिण अमेरिकेचं हृदय' म्हणून ओळखलं जाणारं पराग्वे ग्रामीण पर्यटनासाठी ओळखलं जातं. पराग्वे ब्राझील, अर्जेन्टिना आणि बोलिव्हियाच्या सीमेवरील भाग आहे. येथे तुम्हाला एका रुपयाऐवजी पराग्वे चलन 90.58 गॅरंटीमध्ये मिळेल. ज्या लोकांना साहस आवडते त्यांच्यासाठी हे आवडते ठिकाण आहे.

कंबोडिया हिरव्यागार आणि प्राचीन सभ्यतेसाठी ओळखला जातो. कंबोडियात तुम्हाला एका रुपयासाठी 55.61 रियाल मिळतील. येथे फिरताना तुम्हाला भारतीय चलन समृद्ध वाटेल.