माणसंच नाही माकडंही पाणी टंचाईने बेजार… एक थेंब पाण्यासाठी थेट नळावरच झुंबड; Photo पाहून तुम्हालाही दया येईल

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावच्या गौताळा अभयारण्यातून समोर आलेल्या एका व्हिडिओने मन हेलावून टाकले आहे. माकडं सार्वजनिक नळातून पडणाऱ्या थेंब थेंब पाण्यावर आपली तहान भागवताना दिसत आहेत.

| Updated on: Apr 17, 2026 | 1:30 PM
1 / 5
जळगाव जिल्ह्यातील गौताळा अभयारण्य परिसरातून समोर आलेल्या एका हृदयद्रावक व्हिडिओने सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे. पाटणादेवी मंदिर परिसरात काही माकडं सार्वजनिक नळातून पडणाऱ्या थेंबथेंब पाण्यावर आपली तहान भागवताना दिसत आहेत.

जळगाव जिल्ह्यातील गौताळा अभयारण्य परिसरातून समोर आलेल्या एका हृदयद्रावक व्हिडिओने सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे. पाटणादेवी मंदिर परिसरात काही माकडं सार्वजनिक नळातून पडणाऱ्या थेंबथेंब पाण्यावर आपली तहान भागवताना दिसत आहेत.

2 / 5

ही दृश्ये अत्यंत वेदनादायक असून जंगलातील वाढत्या पाणीटंचाईचे गंभीर चित्र समोर आणतात. गौताळा अभयारण्यात यंदा उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे नैसर्गिक पाणीस्रोत जसे की ओढे, झरे आणि तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत. परिणामी, वन्यजीवांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे.

3 / 5

पाण्याअभावी प्राणी मानवी वस्तीकडे वळत असल्याचे हे जिवंत उदाहरण आहे. फोटोमध्ये दिसणारी माकडं सार्वजनिक नळातून टिपकणाऱ्या पाण्याचे थेंब पकडून पित आहेत. या दृश्यातून त्यांची असहाय्यता स्पष्ट होते. पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी वन्यजीवांना एवढी धडपड करावी लागणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.

4 / 5

या घटनेमुळे जंगलात वन्य प्राण्यांसाठी पुरेशा प्रमाणात पाणवठे तयार करण्यात आले नसल्याचा मुद्दा समोर आला आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा उपाययोजना वेळेत केल्या असत्या तर प्राण्यांना मानवी वस्तीकडे यावे लागले नसते अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.

5 / 5

ही घटना केवळ एका अभयारण्यापुरती मर्यादित नसून भविष्यातील भीषण पाणीटंचाईचा इशारा देणारी आहे. हवामान बदल, वाढते तापमान आणि पाण्याचे अपुरे व्यवस्थापन यामुळे ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us