सलमान खानप्रमाणेच हे मुस्लिम सेलिब्रिटी देखील थाटामाटात बाप्पाचं स्वागत करतात, मनोभावे करतात पूजा

सलमान खानप्रमाणेच असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे मुस्लिम असूनही दरवर्षी आपल्या घरात बाप्पाचं स्वागत करतात. बाप्पावरचं प्रेम व्यक्त करतात. अनेक मुस्लिम सेलिब्रिटींनी गणेश चतुर्थी उत्साहपूर्णपणे साजरी करतात. चला जाणून घेऊयात कोण आहेत ते सेलिब्रिटी.

| Updated on: Sep 02, 2025 | 6:12 PM
1 / 9
सलमान खान : सर्वांना माहित आहे की दरवर्षी सलमान खान आपल्या घरी बाप्पाचे थाटामाटात स्वागत करतो. यावर्षीही सलमान खानच्या घरी बाप्पाचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले. यावर्षीही सलमानने त्याच्या कुटुंबासह आणि जवळच्या मित्रांसह गणेश चतुर्थी साजरी केली. या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये तो त्याचे आईवडील, भाऊ, दोन्ही बहिणी आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत दिसत आहे.

2 / 9
सैफ अली खान : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर देखील दरवर्षी त्यांच्या घरी गणपती बाप्पा आणतात. त्यांचे दोन्ही मुलगे तैमूर आणि जेह देखील पूजेमध्ये सहभागी होतात.यावर्षीही त्यांना इकोफ्रेंडली छोट्याशा बाप्पाचं स्वागत केलं होतं.

3 / 9
शाहरुख खान : बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या घरात हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांचे पालन केले जाते. ज्याप्रमाणे त्याच्या घरात ईद मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते, त्याचप्रमाणे सर्व हिंदू सणही त्याच थाटामाटात साजरे केले जातात. त्यामुळे दरवर्षी त्याच्या घरात गणपती बसवला जातो.

4 / 9
हिना खान : टीव्ही अभिनेत्री हिना खानने यावर्षी तिचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत लग्न केले. लग्नानंतर हिना आता रॉकीसोबत गणेश चतुर्थी साजरी करताना दिसतेय. हिना दरवर्षी गणपती बाप्पाची पूजा करते.

5 / 9
शाहीर शेख : मुस्लिम असूनही, टीव्ही स्टार शाहीर शेख प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात साजरा करतो. मग तो ईद असो किंवा दिवाळी. शाहीर दरवर्षी गणेश चतुर्थी देखील साजरी करतो.

6 / 9
रुबिना दिलेक : अभिनेत्री रुबीना दिलीक देखील गणेशाची भक्त आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही रुबीनाने बाप्पाची मूर्ती तिच्या घरी आणली आहे, ज्याचे फोटो तिने शेअर केले आहेत.

7 / 9
सोहा अली खान : सैफची बहीण, अभिनेत्री सोहा अली खान देखील गणपती बाप्पाची खूप मोठी भक्त आहे. सोहा तिच्या घरात बाप्पाची मूर्ती देखील स्थापित करते.

8 / 9
सारा अली खान : सैफ अली खानची लाडकी लेक तथा अभिनेत्री सारा अली खान, अनेकदा केदारनाथ आणि वैष्णो देवीच्या दर्शनासाठी जाते. सारा दरवर्षी गणपती बाप्पाचं थाटामाटात स्वागत करते.

9 / 9
देवोलीना भट्टाचार्य : देवोलीना भट्टाचार्यने देखील पती शाहनवाज आणि मुलगा जोई यांच्यासोबत गणेश चतुर्थी साजरी केली आहे. वेगवेगळ्या धर्माचे असूनही, देवोलीना आणि तिचा नवरा दोघेही एकमेकांचे सण आणि परंपरा खूप चांगल्या प्रकारे पाळतात.