
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचे प्री वेडिंग फंक्शन हे नुकताच गुजरातमधील जामनगर येथे पार पडले. या फंक्शनला जवळपास सर्वच बाॅलिवूड कलाकार उपस्थित होते.

या प्री वेडिंग फंक्शनमधील विविध फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. यामधील एक फोटो तूफान असा चर्चेत आलाय.

अंबानी कुटुंबासोबत एक व्यक्ती दिसतोय. हा व्यक्ती नेमका कोण हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नसून प्रसिद्ध ज्योतिषी भरत जे मेहरा आहेत.

भरत जे मेहरा आणि मुकेश अंबानी हे दोघे खूप जास्त चांगले मित्र असल्याचे सांगितले जाते. दोघांमध्ये काैटुंबिक संबंध असल्याचे सांगितले जाते.

फक्त मुकेश अंबानी हेच नाही तर शाहरूख खान, सलमान खान यांच्या अत्यंत जवळचे भरत जे मेहरा हे आहेत. ज्योतिषी क्षेत्रातील भरत जे मेहरा हे मोठे नाव आहे.