
अक्षय कुमार याचे चित्रपट एका मागून एक प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याच्या चित्रपटांना म्हणावा तसा धमाका करता येत नाहीये.

काही दिवसांपूर्वीच त्याचा सेल्फी हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, तो चित्रपट फ्लाॅप गेला. अक्षय कुमार हा सध्या हिट चित्रपटाच्या शोधात दिसतोय.

आता नुकताच अक्षय कुमार याच्या हाऊसफुल 5 बद्दलचे एक अत्यंत मोठे अपडेट पुढे आले. हाऊसफुल 5 साठी अक्षय कुमार याने कंबर कसल्याचे बघायला मिळतंय.

विशेष म्हणजे आताच या चित्रपटाच्या शूटिंगबद्दलचे अपडेट आले. हाऊसफुल 5 चित्रपटाची शूटिंग ही 15 जानेवारी रोजी सुरू केली जाणार आहे. सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये अक्षय बिझी आहे.

हाऊसफुल 5 कडून निर्मात्यांना आणि अक्षय कुमार याला अत्यंत मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत. हा चित्रपट मोठा धमाका करेल असेही सांगितले जात आहे.