पाकिस्तानमध्ये मोठी उलथापलथ! थेट संविधान बदलण्याचा घाट, असीम मुनीर बलवान होणार

सध्या पाकिस्तानात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार येथे संविधानात मोठा बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे असीम मुनीर याला बरीच शक्ती मिळणार आहे.

| Updated on: Nov 06, 2025 | 9:27 PM
1 / 5
पाकिस्तानचा लष्करप्रमुख फिल्ड मार्शल असीम मुनीर याच्याकडे अनेक अधिकार आहे. पाकिस्तानत कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर मुनीरचा विचार फार महत्त्वाचा ठरतो.

2 / 5
असे असतानाच आता असीम मुनीर याची ताकद वाढवण्यासाठी पाकिस्तान लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानात संविधान दुरुस्ती करण्यात येत आहे.

3 / 5
पाकिस्तानने 27 वी संविधान दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हा प्रस्ताव संसदेत सादर केला जाईल. या संविधान दुरुस्तीअंतर्गत संविधानातील 243 कलमात बदल केला जाईल. हे कलम सैन्यप्रमुख आणि सैन्यप्रमुखाची नियुक्ती याबाबत आहे.

4 / 5
याच संविधान दुरुस्तीअंतर्गत न्यायाधीशांच्या बदल्यांसंदर्भातही निर्णय घेतला जाऊ शकतो. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीचे नियम याबाबतही काही बदल केले जाऊ शकतात, असे बोलले जात आहे.

5 / 5
सध्या चालू असलेल्या चर्चेनुसार 27 व्या संविधान दुरुस्तीअंतर्गत कमांडर इन चिफ हे नवे संवैधानिक पद तयार केले जाणार आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.