
माहे: पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील माहे जिल्हा हा भारतातील सर्वात लहान जिल्हा आहे. याचे क्षेत्रफळ फक्त 9 चौरस किलोमीटर आहे. याची लोकसंख्या 41816 आहे. लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर 4646 व्यक्ती आहे.

मध्य दिल्ली: मध्य दिल्ली हा भारतातील दुसरा सर्वात लहान जिल्हा आहे. याचे क्षेत्रफळ 21 चौरस किलोमीटर आहे आणि एकूण लोकसंख्या 5,82,320 आहे. या जिल्ह्याचा साक्षरता दर 85.14% आहे.

लक्षद्वीप: लक्षद्वीप हा तिसरा सर्वात लहान जिल्हा आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 30 चौरस किलोमीटरआहे. याची लोकसंख्या 58,232 आहे.

यानम: पुदुच्चेरीचा यानम जिल्हा चौथा सर्वात लहान जिल्हा आहे. याचे क्षेत्रफळ 30 चौरस किलोमीटर आहे. याची लोकसंख्या 55,626 आहे. येखील लोकसंख्येची घनता 1854 आहे.

नवी दिल्ली: देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्ली जिल्ह्याचे क्षेत्रफळ 35 चौरस किलोमीटर आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या 1,42,224 आहे. येथील लोकसंख्येची घनता 4057 आहे.