
या यादीत DLF सहाव्या स्थानावर आहे. DLF या सर्वात मोठ्या भारतीय रिअल इस्टेट कंपनीचा IPO जून 2007 मध्ये आला होता. त्यावेळी कंपनीने IPO च्या माध्यमातून 9187 कोटी रुपये उभे केले होते.

न्यू इंडिया इन्शुरन्स पाचव्या क्रमांकावर आहे. सरकारी विमा कंपनी न्यू इंडिया इन्शुरन्सचा IPO नोव्हेंबर 2017 मध्ये आला होता. कंपनीने IPO च्या माध्यमातून 9600 कोटी जमा केले आहेत.

जनरल इन्शुरन्स कंपनी चौथ्या क्रमांकावर आहे. या सरकारी कंपनीने ऑक्टोबर 2017 मध्ये IPO द्वारे 11373 कोटी रुपये उभे केले.

रिलायन्स पॉवर तिसऱ्या क्रमांकावर आहे. अनिल धीरूभाई अंबानी समूहाची कंपनी रिलायन्स पॉवरने जानेवारी 2008 मध्ये IPO द्वारे 11560 कोटी रुपये उभे केले.

दुसरा क्रमांक कोल इंडियाचा आहे. सरकारी मालकीच्या कोल इंडियाने ऑक्टोबर 2010 मध्ये IPO द्वारे 15,475 कोटी रुपये उभे केले.

1) सर्वात मोठा IPO- विजय शेखर शर्मा यांनी 2000 साली पेटीएमची स्थापना केली. 2010 मध्ये कंपनीने मोबाईल रिचार्जिंग सेवा सुरू केली. तेव्हापासून कंपनीने आपल्या सेवेची व्याप्ती सातत्याने वाढवली आहे आणि सध्या पेटीएम अॅपच्या मदतीने हॉटेल बुकिंग, ट्रेन-प्लेन तिकीट यासह सर्व काही केले जात आहे. पेटीएम 18,300 कोटी रुपयांचा IPO आणत आहे. हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO आहे. आतापर्यंत हा विक्रम कोल इंडिया लिमिटेडकडे होता, जी 2010 मध्ये 15,000 कोटी रुपयांच्या आयपीओसह बाजारात आली होती.