भारतासह या पाच देशांची गेल्या पाच वर्षात सर्वाधिक सोने खरेदी, हा देश पहिल्या क्रमांकावर

सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक देश जगातील अस्थिर स्थिती पाहून सोन्याचा साठा वाढवत आहेत.

| Updated on: Feb 14, 2026 | 11:20 PM
1 / 5
गेल्या काही महिन्यात सोने आणि चांदीच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. साल २०२० ते २०२५ या पाच वर्षांच्या काळात सोन्याच्या किंमतीत जवळपास २६५ टक्के वाढ झाली आहे.

2 / 5
या काळात  चीन, पोलंड, तुर्की आणि भारतासह अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केले आहे. तर काही देशांनी गेल्या पाच वर्षात त्याचे सोन्याचे साठे कमी केले आहेत. यात फिलीपिन्स, कझाकस्तान, श्रीलंका, जर्मनी, मंगोलिया आणि ताजिकिस्तान या देशांचा समावेश आहे.

3 / 5
२०२० ते २०२५ या काळात सर्वाधिक सोने खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीत चीन पहिला क्रमांक आहे. गेल्या पाच वर्षांत चीनने ३५७.१ टन सोन्याची खरेदी केली आहे. मात्र, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की चीनने गुप्तपणे याहून अधिक सोने खरेदी केलेले आहे.

4 / 5
चीननंतर पोलंड हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोने खरेदीदार होता. या युरोपीय देशाने गेल्या पाच वर्षांत ३१४.६ टन सोन्याची खरेदी केले. त्यानंतर तुर्की (२५१.८ टन) आणि भारत (२४५.३ टन) यांचा क्रमांक लागतो. या काळात ब्राझीलने १०५.१ टन, अझरबैजान (८३.६ टन), जपान (८०.८ टन), थायलंड (८०.६ टन), हंगेरी (७८.५ टन) आणि सिंगापूर (७७.३ टन) खरेदी केले.

5 / 5
गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक सोने विकणाऱ्या देशांत फिलीपाईन्स अव्वल स्थानावर असून या देशाने ६५.२ टन सोने विकले आहे. कझाकिस्तानने ५२.४ टन सोने विकले आहे. त्याचप्रमाणे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेने १९.१ टन सोने विकले. २०२० ते २०२५ दरम्यान जर्मनीच्या सोन्याच्या साठ्यात १६.३ टनांची घट झाली, तर मंगोलियाने १५.९ टन सोने विकले. ताजिकिस्तानने ११.९ टन, युरो एरियाने १०.८ टन, कोलंबियाने ९.२ टन आणि फिनलंडने ५.४ टन सोने विकले.