Pakistan Brands : पाकिस्तान भिखारीस्तान असला तरी त्यांच्या या 5 ब्रांड्सना अमेरिका, युरोपपासून जगभरात मोठी मागणी
Pakistan Famous Brands : पाकिस्तान भले बऱ्याच काळापासून कंगाल असेल. IMF पासून वर्ल्ड बँकेकडे पाकिस्तानी राज्यकर्ते सतत हात पसरत असतात. कर्जात बुडालेला आणि महागाईचा सामना करणाऱ्या या देशातील पाच ब्रँड जगप्रसिद्ध आहेत. त्या बद्दल जाणून घ्या.

खादी फक्त भारतातच फेमस नाही. पाकिस्तानी खादीच्या ब्रांडला सुद्धा अमेरिकेपासून ब्रिटनपर्यंत मोठी मागणी आहे. खादी पाकिस्तान एक फॅशन आणि लाइफस्टाइल ब्रांड आहे. 1998 साली कराचीमध्ये या ब्रांडची सुरुवात झालेली. UAE, दुबई, ऑस्ट्रेलिया, मॅक्सिको, मलेशिया, कॅनडा या देशात पाकिस्तानी ब्रँडचे तुम्हाला शो रुम्स दिसतील.

Bar. B. Q Tonight ही रेस्टॉरंट चेन आहे. पाकिस्तानात नोव्हेंबर 1988 साली Bar. B. Q Tonight रेस्टॉरंटची सुरुवात झाली. इथे तु्म्हाला टेस्टी पदार्थ मिळतात. क्वालिटी आणि चव यामुळे दुबई, ओमान, मलेशिया, सिंगापुर, बांग्लादेश या ठिकाणी तुम्हाला Bar. B. Q Tonight चे रेस्टॉरंट दिसतील. आज हा जगातील एक मजबूत ब्रांड आहे.

Pakola हे पाकिस्तानचं कार्बोनेटेड ड्रिंक असून जगभरात याची निर्यात होते. हिरव्या रंगाचं पकोला सॉफ्ट ड्रिंक ब्रांड 1950 साली लॉन्च झाला. अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, मिडल ईस्टच्या देशांमध्ये पाकोला तुम्हाला मिळेल.

मार्खोर फुटवेयर पाकिस्तानचा प्रिमियम ब्रांड आहे. हाताने बनवलेल्या चामड्याच्या चप्पला आणि अन्य उत्पादनं प्रसिद्ध आहेत. जंगली बकरी मार्खोर वरुन या फुटवेयर ब्रांडला 'मार्खोर'चं नाव देण्यात आलं. अमेरिका, यूके, यूएई, ऑस्ट्रेलियासह अनेक देशात तुम्हाला 'मार्खोर'ची उत्पादनं मिळतील.

शान फूड हा पाकिस्तानला मसाला ब्रांड आहे. जगातील अनेक देशात हा मसाला व्यापार पसरलेला आहे. Shan Food Spice ची सुरुवात 1981 साली व्यावसायिक सिकंदर सुल्तान यांनी केली. त्यावेळी कराचीच्या एका छोट्याशा खोलीत सुरु झालेला हा व्यवसाय आज जगातील 60 देशात पसरलेला आहे. अफ्रीका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, यूरोप आणि मिडिल ईस्टच्या देशांमध्ये शान फूडची उत्पादनं विकली जातात.