
तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवले तर तुम्हाला ३१ डिसेंबरपूर्वी नॉमिनी जोडावी लागणार आहे. कारण सेबीने ३१ डिसेंबर ही डिमॅट खात्यात नामांकनाची अंतिम तारीख दिली आहे. जर नॉमिनी जोडला गेला नाही तर, डिमॅट खाते गोठवले जाऊ शकते, ज्यामुळे तुम्ही शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकणार नाही. तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली असली तरी नॉमिनी जोडणे अनिवार्य आहे.

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आयकर विभागाने ३१ जुलै २०२३ ही शेवटची तारीख निश्चित केली होती. परंतु अनेक करदात्यांनी अद्याप हे काम पूर्ण केलेले नाही. अशा लोकांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत विलंब शुल्कासह आयटीआर दाखल करावा लागेल. अन्यथा १ जानेवारीपासून आणखी दंड भरावा लागू शकतो.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सर्व बँकांना त्यांच्या ग्राहकांचे लॉकर करार सुधारित करण्यास सांगितले आहे, ज्यासाठी 31 डिसेंबर ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. हे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण न झाल्यास तुम्हाला बँक लॉकर रिकामे करावे लागू शकते. तुमच्याकडेही बँक लॉकर असल्यास, नवीन लॉकर करार लवकरात लवकर पूर्ण करा.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने पेटीएम, गुगल पे, फोन पे यांसारख्या ऑनलाइन पेमेंट अॅप्सचा UPI आयडी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जे UPI आयडी गेल्या एक वर्षापासून वापरले जात नाहीत ते बंद केले जातील. तुमच्याकडेही असा UPI आयडी असेल, तर तुम्ही ताबडतोब व्यवहार करा.

स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत कलश मुदत ठेव योजना (SBI अमृत कलश FD योजना) देखील 31 डिसेंबर 2023 रोजी बंद होणार आहे. ही 400 दिवसांची FD योजना आहे, जी 7.60% पर्यंत व्याज देत आहे. यामध्ये मुदतपूर्व कर्ज सुविधा उपलब्ध आहे.