

परीक्षेचा काळ हा मुलांसाठी तसेच पालकांसाठी तणावपूर्ण असू शकतो. या स्थितीत पालकांनी परिस्थिती योग्यरित्या हाताळली पाहिजे. अशा वेळी शांत होऊन मुलांशी बोलावे.

परीक्षेदरम्यान, ताण आलाय किंवा चिंता वाटत्ये, हे मुलांना समजत नाही. अशा स्थितीत पालकांनी त्यांना समजून घेतले पाहिजे व हे (चिंता वाटणे) स्वाभाविक आहे, हे त्यांना समजावू सांगावे. मुलांना नकारात्मक विचारातून बाहेर येण्यास मदत करावी.

ताण आल्याने तसेच चिंता वाटल्याने मुलांचे आरोग्य बिघडू शकते. प्रकृती बिघडू नये म्हणून पालक मुलांना दीर्घ श्वसनाचे व्यायाम शिकवू शकतात.

अनेक संशोधनांमधून अशी माहिती समोर आली आहे की डार्क चॉकलेट हे तणाव कमी करण्यासाठी प्रभावी ठरते. मुलांनाही चॉकलेट खायला खूप आवडतं. जर तुमच्या मुलाला ताण जाणवत असेल तर त्यांना थोडे डार्क चॉकलेट खायला द्यावे.