49 वर्षांपूर्वी आलेल्या या गाण्याची आजही तूफान क्रेझ, अवघ्या 9 वर्षांच्या मुलीने दिला होता आवाज
70s Evergreen Romantic Sad Song : जुन्या काातील सुमधुर गाणी आजही लोकांच्या मनात चिरतरूण असतात. वेळेनुसार तर या गाण्यांची गोडी आणखीनच वाढत जाते. प्रेम, जोडीदार आणि हृदयभंगाच्या गाण्यांची क्रेझ तर अजूनही कायम आहे, ती कमी होताना दिसत नाही. या गाण्यांनी नातेसंबंधांमधील भावना आणि विरहाची वेदना अतिशय सुंदर व साध्या शब्दांत गुंफली आहे. त्या भावना ज्या आजही मनाला भिडतात. म्हणूनच60 आणि 70 च्या दशकातील गाणी आजही मोठ्या उत्साहाने ऐकली जातात. ही कालातीत गाणी प्रत्येक पिढीला भुरळ घालतात — अगदी या गाण्याप्रमाणेच, जे 49 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालं होतं, पण आजही हजारो लोकांचा आवडतं आहे.

नव्या पिढीलाही जुन्या सदाबहार गीतांची मोहिनी - आज केवळ वयस्कर लोकं किंवा ज्येष्ठ नागरिकच नव्हे तर तरुणाईही जुन्या हिंदी गाण्यांच्या प्रेमात पडली आहेत. इन्स्टाग्राम आणि यूट्यूबसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे या गीतांना नवसंजीवनी मिळाली. एखादं जुनं भावगीत कानावर पडताच मन नकळत भूतकाळात रमून जातं. साधी पण हृदयस्पर्शी चाल, अर्थपूर्ण शब्द आणि सुरेल गायकी ही या गीतांची खरी ताकद आहे. त्यामुळेच दशकानुदशके उलटून गेल्यानंतरही त्यांची मोहिनी आजही कायम आहे.आज आपण अशाच एका अजरामर गीताविषयी जाणून घेणार आहोत. तब्बल 49 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेलं हे गाणं आजही लाखो रसिकांच्या ओठांवर रेंगाळतं. त्याची धून कानावर पडताच, आपोाप ते गुणगुणायला लागतो. ( All Photos : Social Media)

49 वर्षांनंतरही तेवढंच लोकप्रिय - 1977 मध्ये प्रदर्शित झालेलं 'क्या हुआ तेरा वादा' हे गाणं प्रदर्शित होताच प्रचंड गाजलं. सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी आणि सुषमा श्रेष्ठा यांनी हे गीत गायले होते. विशेष म्हणजे, या गाण्याचं रेकॉर्डिंग होत असताना सुषमा अवघ्या नऊ वर्षांच्या होत्या. पुढे हीच गायिका पूर्णिमा या नावाने लोकप्रिय झाली. 'हम किसी से कम नहीं' या चित्रपटातील हे गाणं ऋषी कपूर, तारिक खान आणि काजल किरण यांच्यावर शूट करण्यात आलं होतं, जे प्रचंड गाजलं. आजही या गीताचं स्थान अढळ आहे.

मनाला मोहिनी घालणाऱ्या या भावस्पर्शी गाण्याचं संगीत होतं ते दिग्गज संगीतकार आर. डी. बर्मन याचं. तर मनाला भावणारे या गाण्याचे बोले लिहीले होते, विख्यात गीतकार मजरूह सुलतानपुरी यांनी. प्रेमभंग, मोडलेली आश्वासनं आणि विरहाचं दुःख या गाण्यात इतक्या प्रभावीपणे व्यक्त झालं आहे की, आजही ते ऐकताना अनेकांच्या डोळ्यांत नकळत पाणी तरळतं. या गाण्यात अभिनेता तारिक खान प्रभावीपणे, त्याच्या मनातील वेदना ऋषी कपूर आणि काजल किरण यांच्यासमोर व्यक्त करतो. आजही हे गाण श्रोत्यांच्या मनाला तितक्याच तीव्रतेने भिडतं.

सुमारे पाच दशकांनंतरही, म्हणजेच तब्बल 50 वर्षांनीही 'क्या हुआ तेरा वादा' हे गाणं लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यूट्यूबवरील सारेगामाच्या अधिकृत लिरिकल व्हिडिओला 5.5 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय या गाण्याच्या विविध कव्हर व्हर्जन्स आणि नव्या सादरीकरणांनाही लाखो-कोट्यवधी प्रेक्षकांनी पसंती दिली. आजची तरुण पिढीही हे गीत तितक्याच आवडीने ऐकत असते. सोशल मीडियावर सातत्याने ट्रेंड होणारे रील्स आणि व्हिडिओ यातून गाण्याची आजही कायम असलेली लोकप्रियता सहज दिसून येते.

या गाण्याप्रमाणेच 'हम किसी से कम नहीं' हा चित्रपटही प्रचंड गाजला. नासिर हुसेन यांच्या निर्मिती आणि दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या चित्रपटात ऋषी कपूर, काजल किरण, झीनत अमान आणि अमजद खान यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. 1 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेलाहा चित्रपट खूप यशस्वी झाला आणि बॉक्स ऑफीसवरही दमदार कमाई केली.