18 व्या वर्षी लग्न, लिव्ह-इन रिलेशनशिप आणि चार जणांसोबत प्रेमसंबंध, कोण आहे ही अभिनेत्री?

लग्न झालेल्या गायकाच्या प्रेमात पडली होती ही बॉलिवूड अभिनेत्री. जेव्हा माहिती समोर आली तेव्हा तिने नात्याला केला विरोध. कोण आहे ही अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Aug 16, 2026 | 1:35 PM
1 / 5
‘बिग बॉस 19’मुळे अभिनेत्री कुनिका सदानंद पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. 1993 मध्ये त्यांचं प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्यासोबत नातं असल्याची चर्चा होती. त्या काळात कुमार सानू विवाहित होते, मात्र पत्नीपासून वेगळे राहत होते.

2 / 5
या नात्याची माहिती त्यांच्या तत्कालीन पत्नी रीटा भट्टाचार्य यांना मिळाल्यानंतर वाद निर्माण झाल्याचं कुनिका यांनी सांगितलं होतं. त्यांनी एका मुलाखतीत असा दावा केला होता की, रीटा यांनी हॉकी स्टिकने त्यांच्या कारची तोडफोड केली होती.

3 / 5
कुनिका यांच्या मते, कुमार सानूसोबतचं त्यांचं नातं अनेक वर्षे टिकले. मात्र, कुमार सानू त्यांच्यासोबतही प्रामाणिक नसल्याचं लक्षात आल्यानंतर हे नातं संपुष्टात आलं. या ब्रेकअपनंतर त्या मोठ्या भावनिक धक्क्यातून गेल्या आणि त्यांनी दारूचा आधार घेतल्याचंही सांगितलं आहे.

4 / 5
कुनिका यांनी वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी लग्न केलं होतं. त्यांच्या आयुष्यात दोन लग्नं, दोन लिव्ह-इन रिलेशनशिप आणि चार प्रेमसंबंध आल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं आहे.

5 / 5
दरम्यान, ‘बिग बॉस 19’मधील त्यांच्या प्रवासादरम्यान आणखी एका नात्याची चर्चा रंगली. घरात कुनिका आणि फरहाना भट्ट यांच्यात अनेकदा वाद झाले. त्यानंतर कुनिका यांनी फरहाना आणि त्यांचा मुलगा अयान यांच्यात कोणतंही नातं नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us