
मुकेश अंबानीचे मुंबईमध्ये अँटेलिया घर आहे आणि हे घर अत्यंत आलिशान आहे. नेहमीच मुकेश अंबानींच्या घरी विविध प्रोग्राम ठेवले जातात.

जेवणासाठी बरेच लोक नेहमीच अंबानींच्या घरी असतात. अंबानींच्या घरी खास पद्धतीने सर्वांसाठी पोळ्या बनतात. कोणी महिला वगैरे अंबानींच्या घरी पोळ्या बनवत नाहीत.

मशीनच्या मदतीने अंबानींच्या घरी हजारो पोळ्या बनतात असा दावा हा करण्यात आलाय. काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

असा दावा केलाय की, मुंबईतील ताज हाॅटेल आणि अंबानींच्या घरी याच मशीनमधून पोळ्या बनवल्या जातात. वेगवेगळ्या आकाराच्या पोळ्या या मशीनमध्ये बनवल्या जातात.

अंबानींचे अँटेलिया घर 15 हजार कोटींचे असल्याचे सांगितले जाते. या घरात अनेक सोईसुविधा असल्याचे देखील सांगितले जाते.