
असं म्हणतात की एका व्यक्तीसारखे दिसणारे जगात 7 लोक असतात. बॉलिवूडमधील अनेक सेलेब्स आहेत ज्यांच्या सारखे दिसणारे अनेक लोक आहेत. कलाकारांप्रमाणेच ते सुद्धा सोशल मीडियावरही खूप प्रसिद्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला प्रियंका चोप्रा सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीबद्दल सांगत आहोत.

प्रियंका चोप्रा सारखी दिसणारी ही व्यक्ती आहे नवनीत बंगा. ती फिटनेस ब्लॉगर आहे. नवनीत फिटनेसचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नवनीतचा लुक प्रियांका चोप्रासारखा आहे.

प्रियंका चोप्राप्रमाणे नवनीतच्या हातावरही टॅटू आहे. ती तिच्या फोटोंमध्ये हा टॅटू फ्लॉन्ट करताना दिसते.

नवनीतचा प्रत्येक फोटो शेअर होताच सोशल मीडियावर व्हायरल होतो.

इन्स्टाग्रामवर नवनीतला जवळजवळ 2 लाखाहून अधिक लोक फॉलो करतात. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटलाही ब्यू टिक मिळाली आहे. म्हणजेच तिचं अकाउंट इन्स्टाग्रामनं व्हेरिफाय केलं आहे.