9.2 आयएमडीबी रेटिंगची जबरदस्त सीरिज, सत्य घटनेवर आधारित कथा, ‘दिल्ली क्राइम’पेक्षाही तगडा सस्पेन्स

2020 मध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेवर आधारित ही वेब सीरिज आहे. या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवलं होतं. या वेब सीरिजला आयएमडीबीवर 9.2 अशी दमदार रेटिंग मिळाली आहे. झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज स्ट्रीम होत आहे.

| Updated on: May 17, 2026 | 12:45 PM
1 / 5
सत्य घटनांवर आधारित कथा चित्रपट किंवा वेब सीरिजमध्ये दाखवण्याचा उद्देश हा लोकांना सत्याची जाणीव करून देण्याचा, प्रेक्षकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा आणि महत्त्वाच्या समस्यांवर प्रकाश टाकण्याचा असतो. अशा कथा इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासही मदत करतात.

2 / 5
अशाच एका सत्य घटनेवर आधारित वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आला. 2020 मध्ये घडलेल्या ज्या घटनेवरून देशभरात संतापाची लाट उसळली होती, त्या हाथरस घटनेवर आधारित ही सीरिज आहे. या घटनेमुळ जातीय हिंसाचाराविरोधात व्यापक आंदोलनं झाली होती. आता ओटीटीवर या घटनेवर आधारित सीरिज प्रदर्शित झाल्यामुळे ही जुनी घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

3 / 5
सत्य घटनांवर आधारित अनेक वेब सीरिज ओटीटीवर आहेत. 'दिल्ली क्राइम', 'आश्रम', 'ब्लॅक वॉरंट' यांनंतर आता 'हाथरस : 16 डेज' ही सीरिज चर्चेत आली आहे. या नव्या सीरिजचे फक्त 3 एपिसोड आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. पॅट्रिक ग्रॅहम दिग्दर्शित या सीरिजमध्ये 2020 च्या हाथरस घटनेनंतरच्या हृदयद्रावक 16 दिवसांची कथा दाखवण्यात आली आहे.

4 / 5
चंद्रशेखर आझाद रावण, निधी सुरेश आणि अमिल भटनागर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'हाथरस : 16 डेज' या सीरिजला आयएमडीबीवर दहापैकी 9.2 अशी उत्तम रेटिंग मिळाली आहे. ही सीरिज तुम्ही ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. 14 सप्टेंबर 2020 रोजी उत्तर प्रदेशातील हाथरस इथं एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. याच घटनेवर आधारित ही सीरिज आहे.

5 / 5
एका क्रूर गुन्ह्याने सुरू झालेली ही घटना लवकरच जातीय व्यवस्था, राजकारण, सत्ता आणि माध्यमांचा गैरवापर आणि सत्य दडपून टाकणाऱ्या यंत्रणांची काळी बाजू उघड करते. यामध्ये प्रत्यक्षदर्शींचे अनुभव, प्रत्यक्ष घटनास्थळावरील वृत्तांकन, जुने फुटेज, पत्रकार, कार्यकर्ते यांचा दृष्टीकोन हे सर्वकाही पहायला मिळतं.

Follow Us