प्रचंड उकाड्याने कंटाळला आहात,कुटुंबासह या ७ पर्यटन स्थळांवर फिरुन या

Best Summer Vacation Places In India: उन्हाळ्याच्या सुट्ट्यात अनेक लोक फिरायला जाण्याचा प्लान करतात. उन्हाळ्यातील उकाड्याने हैराण झालेले लोक फिरायला जाताना थंड हवेचे ठिकाण निवडत असतात. त्यामुळे कुटुंबासह निवांत वेळ घालवण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणांची निवड केली जातो. भारतातील अशी सात पर्यटन स्थळे पाहूयात येथे तुम्ही कुटुंबासह फिरालया जावू शकता. परदेशात लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा ही ठिकाणी कमी पैशात आनंद देतात.

| Updated on: May 18, 2026 | 10:02 PM
1 / 7
तामिळनाडूचे कून्नूर - जर तुम्हाला कुटुंबासह एखाद्या शांत आणि कमी गर्दीच्या ठिकाणी फिरायचे असेल तर तामिळनाडू येथील कूनूर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन होऊ शकते. येथील टॉय ट्रेनची सवारी, चहाचे मळे आणि नेचर वॉक मुलांना आणि मोठ्यांना देखील आवडतील.

तामिळनाडूचे कून्नूर - जर तुम्हाला कुटुंबासह एखाद्या शांत आणि कमी गर्दीच्या ठिकाणी फिरायचे असेल तर तामिळनाडू येथील कूनूर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन होऊ शकते. येथील टॉय ट्रेनची सवारी, चहाचे मळे आणि नेचर वॉक मुलांना आणि मोठ्यांना देखील आवडतील.

2 / 7

सिक्किमचे गंगटोक - सिक्किम येथील गंगटोक येथील स्वच्छता आणि सुंदर पर्वत तसेच शांत निसर्गासाठी ओळखले जाते. येथील केबल कार राईड, मठ आणि शानदार व्यूह्य मुलांसह मोठ्यांना देखील आवडणारे आहेत.

3 / 7

उत्तराखंडचे ऋषिकेश - ऋषिकेश केवळ धार्मिक स्थळ नाही तर ते फॅमिली ट्रिपसाठी देखील बेस्ट जागा आहे. येथील नदी किनारी असलेल कॅफे, छोटी ट्रॅकींग आणि एडव्हेंचर एक्टिव्हीटिज अबालवृद्धांना आवडतील असे आहेत.

4 / 7

कश्मीरचे गुलमर्ग - जर तुम्ही उन्हाळ्यात बर्फाचा आनंद घ्यायचा असेल तर कश्मीरचे गुलमर्ग चांगली जागा आहे. येथील गोंडोला राईड, पांढऱ्या बर्फाने झाकलेले डोंगर आणि सुंदर निसर्ग अबाल वृद्धांना आकर्षित करतो.

5 / 7

उत्तराखंडचे नैनीताल - नैनीताल दीर्घकाळापासून फॅमिली ट्रिपसाठी लोकांचे आवडते ठिकाण आहे. येथे बोटिंग, रोपवे आणि बाजार फिरण्याचा आनंद वेगळाच आहे. येथे तुम्ही रिलॅक्सेशन आणि एडवेंचर दोन्हीचा आनंद लुटू शकता.

6 / 7

केरळमचे मुन्नार - हिरवेगार चहाचे डोंगर आणि थंड वातावरण मुन्नारला एक खास समर व्हेकेशन परफेक्ट बनवतात. येथे मुलांना वाईल्डलाईफ पाहाण्यासाठी नेता येईल. तसेच येथील टी म्युझियम फिरायला देखील मजा येते,शिवाय येथील निसर्ग सर्वांनाचे मोहवून टाकणारा आहे.

7 / 7

तामिलनाडुचे कोडाईकनाल - कोडाईकनालला प्रिन्सेस ऑफ हिल स्टेशन म्हटले जाते.येथील तलाव आणि थंड हवा तसेच सुंदर निसर्ग लोकांना अगदी मोहवून टाकतो. येथे तुम्ही कुटुंबासह बोटिंगचा आनंद देखील घेऊ शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us