
Car Technology: कार थांबवण्यासाठी पहिल्यांदा क्लच दाबावा की ब्रेक? असा सवाल विचारला जातो. कार ब्रेकिंग सिस्टिमविषयी अनेकांच्या मनात शंका असतात. कार चालवणे शिकताना, ड्रायव्हिंग क्लास लावलेला असताना याविषयीची शंका अनेकांच्या मनात याविषयीची शंका येते.

क्लचे काम चाकाला गिअरबॉक्सपासून मोकळे करणे हे आहे. जेव्हा कार चालवताना गिअर टाकल्या जातो तेव्हा गिअरबॉक्स चाकांना पुढे पळवतो. पण जेव्हा तुम्ही क्लच दाबता तेव्हा गिअरबॉक्सचा चाकांवर परिणाम होत नाही. त्यानंतर ब्रेक दाबून कार थांबवली जाऊ शकते.

तर पहिले कारचा क्लच दबावा की ब्रेक हे तुमच्या कारच्या गतीवर अवलंबून असते. जर कारची गती कमी असेल तर अगोदर ब्रेक आणि नंतर क्लच दाबणे योग्य राहिल. जर कार अधिक वेगात असेल तर पहिल्यांदा हलका ब्रेक मारणे आणि नंतर क्लच दाबणे योग्य ठरेल.

जर क्लच आणि ब्रेक योग्य पद्धतीने दाबला तर कारचे नुकसान होत नाही. जर तुम्ही एकदम स्पीडमध्ये असाल आणि अचानक ब्रेक लावला तर झटका बसू शकतो. त्यामुळे याविषयीचे जजमेंट तुम्हाला येणे आणि योग्य निर्णय घेण्याची सवय गरजेचे आहे.

कार थांबवण्यासाठी क्लचची गरज असते. वेग कमी असेल तर अगोदर आणि वेग अधिक असेल तर नंतर क्लच दाबावा. जर विना क्लच दाबता कार थांबवण्याचा प्रयत्न केला तर कारचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

क्लच न दाबून जर तुम्ही केवळ ब्रेक दाबला तर ब्रेक लावल्यामुळे गिअरबॉक्स कार पुढे रेटण्यासाठी मजबूर करतो. क्लच न दाबल्यामुळे चाकावर गिअरबॉक्सचा परिणाम होतो. त्यामुळे कारला फ्री करण्यासाठी तुम्हाला क्लच दाबावा लागेल.