Todays Gold Rate: सोन्याचे भाव चांगलेच कोसळले! थेट चार हजार रुपयांची घसरण, आज 10 ग्रॅमसाठी…
Todays Gold Rate: काल पासून सतत सोने आणि चांदीच्या दरात घसरण होत असल्याचे दिसत आहे. आजचा दिवस तर सोने खरेदी करणाऱ्यांसाठी चांगला आहे. कारण आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कालच्या तुलनेत ही घसरण मोठी आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा चांगला आहे.
दिवाळीच्या तोंडावर सोन्या चांदीच्या दरात मोठ्या घसरणीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. चला जाणून घेऊया सोने आणि चांदीचा आजचा भाव काय आहे?
आज सोन्याच्या दरात तब्बल 3 हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा भाव हा जीएसटीसह 1 लाख 42 हजार 140 रुपयांवर पोहोचला आहे.
तर दुसरीकडे चांदीच्या दरात तब्बल 7 हजारांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर एक किलो चांदीचा भाव हा जीएसटीसह 1 लाख 87 हजार 460 रुपयांवर पोहोचला आहे. आठ दिवसात सोन्याच्या दरात 4 हजारांची तर चांदीच्या दरात तब्बल 20 हजारांची घसरण झाली आहे.
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)