Todays Gold Rate: अरे वाह! युद्धाच्या वणव्यात सोनं झालं स्वस्त, आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय?
Todays Gold Rate: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात चांगलीच घसरण होताना दिसत आहे. आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती ते जाणून घ्या...

अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांनी मिळून इराणवर हल्ला केला. त्यानंतर इराणने दोन्ही देशांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धाचा परिणाम अनेक गोष्टींवर होताना दिसत आहे. सोन्याचे दर देखील चांगलेच वाढले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून सतत वाढत असणारे सोन्याचे दर अचानक घसरले आहेत. आज तर सोन्याच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. सोबतच चांदीचे दर देखील आपटले आहेत.

आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर आकाशाला स्पर्श करणाऱ्या चांदीच्या दरात तब्बल 5 हजारांची घसरण झाली आहे.

10 ग्रॅम सोन्यासाठी आज जीएसटीसह 1 लाख 62 हजार 225 रुपये मोजावे लागणार आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 67 हजार 800 रुपयांवर पोहोचले आहेत. जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदीचा विचार करत असाल तर आज करु शकता.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)