सोनं दणकन आपटलं, भावात मोठी घसरण; आता सोन्या, चांदीचे नवे दर काय?
गेले काही दिवस सातत्याने सोन्याच्या दरात वाढ सुरूच होती, परंतु आता सोन्याच्या दरात घसरण सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे. सोन्याचा दर प्रति तोळा 1 लाख 70 हजारांच्या आसापास पोहोचला होता, मात्र आता सोन्याचे दर प्रति तोळा दीड लाखांपेक्षा कमी झाले आहेत.

सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे, आज देखील सोन्याचे दर कमी झाल्याचं पहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळ्या मागे तब्बल एक हजार 500 रुपयांची घसरण झाली आहे.

जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्यानं आता सोन्याचे दर प्रति तोळा जीएसटीसह 1 लाख 47 हजार 290 रुपयांवर आले आहेत.

तर दुसरीकडे चांदीचे दर मात्र स्थिर आहे, चांदीच्या दरात कोणतंही घसरण झालेली नाहीये, किंवा ते वाढलेले देखील नाहीत. जळगावच्या सराफा बाजारात सध्याचे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो 2 लाख 31 हजार 750 रुपये एवढे आहेत.

गेल्या 15 दिवसांपासून सातत्याने सोन्याच्या दरात घसरण सुरू असल्याची माहिती जळगावच्या सराफा व्यावसायिकांनी दिली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम सोन्याच्या दरावर होतो, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.