Todays Gold rate: सोन्याची सर्वात मोठी पडझड! एका दिवसात तब्बल… आजचा 10 ग्रॅमचा भाव सर्वसामान्यांना परवडणारा

Todays Gold rate: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर आकाशाला स्पर्श करताना दिसत आहेत. आज तर सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. ही घसरण किती आहे चला जाणून घेऊया...

| Updated on: Feb 05, 2026 | 7:21 PM
1 / 5
तुळशीच्या लग्नानंतर लग्नाच्या मुहूर्तांना सुरुवात होते. त्यानंतर अनेक ठिकाणी लग्न सोहळ सुरु होतात. लग्न सोहळे म्हटले की कपडे, दागिन्यांची खरेदी आलीच. पण गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेल्या सोन्याच्या भावांमुळे सर्वांना प्रश्न पडला आहे की सोने-चांदी खरेदी करावे की नाही. पण आज सोन्याचा भाव हा दिलासा देणारा आहे.

2 / 5

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे सर्वसामान्यांना सोने आणि चांदी खरेदी करताना दहावेळा विचार करावा लागत आहे. पण आज जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली.

3 / 5

आज सोन्याच्या भावात तब्बल 5 हजार 900 रुपये तर चांदीच्या दरात 20 हजार रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस नक्कीच चांगला आहे.

4 / 5

आज सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 57 हजार 590 रुपयांवर पोहोचले तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 72 हजार 950 रुपयांवर पोहोचले. गेल्या पाच दिवसापासून सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये चढ-उतार होत असल्याच पाहायला मिळत आहे.

5 / 5

सोन्या आणि चांदीच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. (टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us