Todays Gold Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्याचे भाव चांगलेच घसरले, 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: आजचा दिवस सोने खरेदीसाठी उत्तम दिवस आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज नक्की करा. कारण सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

| Updated on: Apr 28, 2026 | 5:21 PM
1 / 5
भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदी यां दोन्हीही मौल्यवान धातूंना सर्वाधिक महत्त्व दिले जाते. सणासुदीला किंवा आनंदाच्या वेळी सोने खरेदी केले जाते. पण आजकाल वाढलेले सोन्याचे दर पाहून सर्वसामान्यांना सोने खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागत आहे. मात्र, आज सोन्याचे भाव चांगलेच घसरले आहेत.

2 / 5

गेल्या काही दिवसांपासून जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीचे भाव अस्थिर असल्याचे पाहायला मिळाले. मिडल इस्टमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा सोने आणि चांदीच्या किंमतीवर सर्वाधिक परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.

3 / 5

आज, 28 एप्रिल रोजी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात 6 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

4 / 5

28 एप्रिल रोजी 10 ग्रॅम सोन्यासाठी जीएसटीसह 1 लाख 53 हजार 985 रुपये मोजावे लागणार आहेत. तर एक किलो चांदीसाठी 2 लाख 49 हजार 260 रुपये. आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे सर्वसामान्यांसाठी खरेदीसाठी चांगला दिवस आहे.

5 / 5

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us