Todays Gold Rate: धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी सोन्याचे भाव कडाडले! धडकी भरवणारा रेट, आज 10 ग्रॅम…

Todays Gold Rate: दिवाळी हा सण तोंडावर असताना सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. हे दर वाचून सोने खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागणार आहे. चला जाणून घेऊया आजच भाव किती?

| Updated on: Nov 05, 2026 | 12:01 PM
1 / 5
अनेकजण धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानतात. त्यामुळे या दिवशी सोने खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. पण दिवाळी हा सण तोंडावर असताना सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागणार आहे. चला जाणून घेऊया आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव आणि एक किलो चांदीचा भाव किती आहे?

2 / 5

जळगावच्या सराफ बाजारात दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोन्या चांदीच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. सोन्याच्या दरात तब्बल 3 हजार 800 रुपयांची तर चांदीच्या दरात देखील ५ हजारांची वाढ झाली आहे.

3 / 5

सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव जीएसटीसह 1 लाख 49 हजार 350 रुपयांवर पोहोचला आहे. तर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 850 रुपयांवर आहेत.

4 / 5

गेल्या 24 तासांत सोन्याच्या दरात तब्बल 7 हजारांची तर चांदीच्या दरात 15 हजारांची वाढ झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यावधी निवडणुकीतील पराभवाचा सोन्या चांदीच्या दरावर परिणाम झाल्याची सराफ व्यावसायिकांची माहिती दिली आहे.

5 / 5

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us