
टोमॅटोच्या बियांमध्ये तंतुमय पदार्थ (फायबर) असतात, जे पचन सुधारतात व बद्धकोष्ठतेपासून आराम देतात. काही प्रमाणात ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत.

टोमॅटोच्या बियांमध्ये लाइकोपीन व बीटा-कॅरोटीनसारखे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे पेशींना नुकसानापासून संरक्षण देतात. बियांतील पोषक घटक रक्त पातळ ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे रक्ताभिसरण चांगले राहते.

बियांतील जीवनसत्त्वे त्वचेला तजेला देतात आणि केस गळती कमी करतात. त्यामुळे अनेक जण फक्त टोमॅटो किंवा टोमॅटोचा सूप देखील पितात. पण काही समस्या असलेल्यांनी टोमॅटो खाणं टाळावं.

ज्यांना अॅसिडिटी, पोटात गॅस किंवा इरिटेबल बाउल सिंड्रोम आहे, त्यांना टोमॅटोच्या बियांमुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे अॅसिडिटी, पोटात गॅस किंवा इरिटेबल बाउल सिंड्रोम यांसारख्या समस्या असणाऱ्यांनी टोमॅटो खाऊ नये.

किडनी स्टोनचा धोका असलेल्यांनी देखील टोमॅटोच्या खाऊ नये. टोमॅटोच्या बियांमध्ये ऑक्सलेट्स असतात ज्यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढवू शकतात.