भारतात ‘या’ 5 स्कूटरची सर्वाधिक विक्री, किंमत 70 हजार रुपयापासून सुरु!
Top 5 Best Selling Scooters : जर तुम्ही नवीन स्कूटर विकत घेण्याचा विचार करत असाल, तर भारतातील बेस्ट सेलिंग स्कूटर्सची लिस्ट पाहा. कुठल्या स्कूटरला ग्राहकांची जास्त पसंती आहे ते समजून घ्या.

होंडा एक्टिवाच्या 1,95,604 यूनिट्सची जुलै 2024 मध्ये विक्री झाली. या स्कूटरची किंमत 76,684 रुपयापासून सुरु होते. हा एक्स-शोरूमच्या हिशोबाने भाव आहे.

जुलै 2024 मध्ये TVS Jupiter च्या 74,663 यूनिट्सची विक्री झाली. या स्कूटरची किंमत 73,700 रुपयापासून सुरुवात होते. हा एक्स-शोरूमच्या हिशोबाने भाव आहे.

Suzuki Access च्या 71,247 यूनिट्सची जुलै महिन्यात विक्री झाली. या स्कूटरची किंमत 79,899 रुपयापासून सुरु होते. हा एक्स-शोरूमच्या हिशोबाने भाव आहे.

Honda Dio च्या 33,447 यूनिट्सची यावर्षी जुलै महिन्यात विक्री झाली. 110 सीसीच्या या स्कूटरची किंमत 70211 रुपयापासून सुरु होते. हा एक्स-शोरूमच्या हिशोबाने भाव आहे.

जुलै 2024 मध्ये TVS Ntorq च्या 26,829 यूनिट्सची विक्री झाली. 125 सीसी असलेल्या या स्कूटरची किंमत 89,641 रुपये आहे. एक्स-शोरूमचा हा दर आहे.