
आयपीएलमध्ये सर्वाधिक ओव्हर टाकण्याच्या यादीमध्ये पाचव्या स्थानी रविंद्र जडेजा आहे. जडेजा याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 591.1 ओव्हर टाकल्या आहेत. जडेजा याच्याकडे सीएसके संघाची धुरा जाणार असल्याचं बोललं जातं.

चौथ्या क्रमांकावर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार असून त्याने 594.4 ओव्हर टाकल्या आहेत. या यादीमध्ये टॉप पाचपैकी भुवनेश्वर हा एकमेव वेगवान गोलंदाज आहे.

पियुष चावला आता 35 वर्षांचा आहे, परंतु त्याच्या खराब तंदुरुस्तीमुळे आणि कामगिरीमुळे कदाचित आयपीएल 2024 नंतर तो या स्पर्धेत दिसणार नाही. मुंबई इंडियन्सने त्याला यंदा काही संधी दिल्या आहेत, पण तो दर्जेदार राहिलेला नाही. त्याची गुगली देखील फेल होत आहे.

या यादीत दुसऱ्या स्थानी विदेशी गोलंदाजा आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून सुनील नरेन आहे. नरेन याने 624.1 ओव्हर टाकल्या आहेत. सुनील नरेन हा पहिल्यापासून केकेआर संघाकडून खेळत आला आहे.

पहिल्या क्रमांकावर आर. अश्विन असन त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक 699 ओव्हर टाकल्या आहेत. अश्विन आयपीएलमध्ये सीएसके, पुणे रायझिंग सुपरजायंट्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघांकडून खेळला आहे.