Photo : चेंबुरमध्ये धावत्या शाळेच्या बसवर कोसळलं झाड, 10 मुले गंभीर जखमी

Chembur Bus Accident : चेंबूरमध्ये मोठा अपघात झाला आहे. शाळेच्या बसवर मोठे झाड कोसळून अनेक मुले जखमी झाली आहेत. याचे काही फोटो समोर आले आहेत.

बापू गायकवाड | Updated on: Jun 30, 2026 | 4:27 PM
1 / 5
मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे, चेंबूरमध्ये मोठा अपघात झाला आहे. शाळेच्या बसवर मोठे झाड कोसळून अनेक मुले जखमी झाली आहेत.

मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे, चेंबूरमध्ये मोठा अपघात झाला आहे. शाळेच्या बसवर मोठे झाड कोसळून अनेक मुले जखमी झाली आहेत.

2 / 5

चेंबूर येथील 11 नंबर रोडवर एका शाळेच्या बसवर झाड कोसळले आहे. या घटनेत 10 मुले गंभीर जखमी झाली आहेत. एक मुलगा अजूनही आतमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे.

3 / 5

समोर आलेल्या फोटोत भलेमोठे झाड बसवर कोसळले, यामुळे बसचे मोठे नुकसान झाले. या घटनेत मुले आत अडकून पडली होती. या घटनेची माहिती मिळताच तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले.

4 / 5

सध्या बसमधील मुलांना बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या बसवरी झाड हटवण्याचे काम सुरू आहे. तर एक मुलगा बसमध्ये अडकल्याची माहिती उपमहापौर संजय घाडी यांनी दिली आहे.

5 / 5

दरम्यान, ही बस कोणत्या शाळेची होती? बसमध्ये किती मुले होती याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. सध्या युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे असं संजय घाडी यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us