
करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) तिच्या अनोख्या स्टाईलसाठी ओळखली जाते. ती अनेकदा कॅज्युअल आउटफिटमध्ये दिसते. एअरपोर्ट लूकसाठी यावेळी करीनानं डेनिम जीन्ससोबत प्रिंटेड शर्ट कॅरी केला होता. या ड्रेससाठी तिनं तिचे केस बांधले होते. तर परफेक्ट लूकसाठी तिनं व्हाईट स्निकर कॅरी केले.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत असते. एअरपोर्ट लूकसाठी या अभिनेत्रीनं फंकी स्टाईलमध्ये डबल पॅटर्नचा शर्ट परिधान केला होता, ब्लॅक रिप जीन्ससोबत तिनं हा ड्रेस कॅरी केला होता. या शर्टमध्ये अभिनेत्री प्रचंड कूल दिसत होती.

सारा अली खाननं मरून रंगाच्या सीक्विन स्कर्टसोबत हा फँसी निळा आणि पांढरा शर्ट कॅरी केला होता. तिनं हुप आणि मेसी बन तयार केला होता. या लूकमध्ये सारा प्रचंड सुंदर दिसत होती.

सामन्था अक्केनेनी तिच्या फॅशन स्टाईलमुळे बर्याचदा वर्चस्व गाजवते. अभिनेत्रीनं मॅचिंग पँटसोबत यलो पोल्का डॉट शर्ट कॅरी केला.

मीरा राजपूत सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव असते. मीरानं इंस्टाग्राम व्हिडीओमध्ये एक प्रिंटेड शर्ट कॅरी केला होता, या शर्टला तिनं काळ्या जीन्ससह कॅरी केला होते.