नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर 2 महिने बंद ; सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर काही काळ बंद राहणार

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर काही काळ बंद ठेवले जाणार आहे. येत्या 15 किंवा 16 ऑक्टोबरपासून सुमारे दोन महिने मंदिर बंद ठेवण्याच्या सूचना मंदिर प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

| Updated on: Oct 08, 2026 | 8:41 PM
1 / 5
दसऱ्याच्या निमित्ताने लाखो भाविक नाशिकच्या त्र्यंबकेश्वरचे दर्शन घेत असतात. दरवर्षी भाविकांची मोठीच्या मोठी रांगच्या रांग पाहायला मिळते.

दसऱ्याच्या निमित्ताने लाखो भाविक नाशिकच्या त्र्यंबकेश्वरचे दर्शन घेत असतात. दरवर्षी भाविकांची मोठीच्या मोठी रांगच्या रांग पाहायला मिळते.

2 / 5

पण यंदा त्र्यंबकेश्वरचे मंदिर 2 महिने बंद राहणार आहे. त्यामुळे भाविकांना त्र्यंबकेश्वर दर्शन घेता येणार नाही.

3 / 5

मंदिर बंद राहण्याबाबत नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याचे काम पूर्ण करण्यासाठी काही काळ मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.

4 / 5

येत्या 15 किंवा 16 ऑक्टोबर 2026 पासून मंदिर प्रशासनाला मंदिर 2 महिने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे

5 / 5

मंदिर संस्थान किंवा जिल्हा प्रशासनाकडून अंतिम निर्णय आणि तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us