प्रेम हे नेहमीच..; थलपती विजय यांच्या शपथविधीनंतर त्रिशाकडून उघडपणे नात्याची कबुली?

थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर अभिनेत्री त्रिशा कृष्णनने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनची सध्या जोरदार चर्चा आहे. कारण या कॅप्शनमुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.

| Updated on: May 12, 2026 | 9:34 AM
1 / 5
तमिळगा वेत्री कझगमचे (टीव्हीके) प्रमुख आणि दाक्षिणात्य अभिनेते सी. जोसेफ विजय जे थलपती विजय या नावाने ओळखले जातात, त्यांनी 10 मे रोजी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात सर्वाधिक चर्चा अभिनेत्री त्रिशा कृष्णनचीच झाली.

2 / 5
थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला त्रिशा अत्यंत पारंपरिक अंदाजात पोहोचली होती. यावेळी तिने निळ्या रंगाची रेशमी साडी नेसली होती. त्यावर साजेसा मिनिमल मेकअप, दागिने आणि केसांत गजरा.. असा हा तिचा लूक होता. त्रिशाने सोहळ्यानंतर तिच्या इन्स्टाग्रामवर या साडीतील खास फोटो पोस्ट केले. परंतु या फोटोंवरील कॅप्शनची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

3 / 5
गेल्या काही काळापासून त्रिशा आणि विजय यांच्या नातेसंबंधाच्या जोरदार चर्चा आहेत. एकीकडे विजय यांच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे, तर दुसरीकडे त्रिशा आता खुलेपणानं तिचं प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. हेच तिच्या फोटोंच्या कॅप्शनमध्येही पहायला मिळालं.

4 / 5
The love is always louder अर्थात प्रेमाचा आवाज नेहमीच मोठा असतो.. अशा आशयाचं कॅप्शन त्रिशाने तिच्या या फोटोंना दिला आहे. नेटकऱ्यांनी या कॅप्शनवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. शपथविधी सोहळ्यातही त्रिशाचे डोळे भरून आल्याचं पहायला मिळालं होतं.

5 / 5
त्रिशाच्या या कॅप्शनमुळे विजय यांच्यासोबतच्या नातेसंबंधाच्या चर्चांना आता आणखी हवा मिळाली आहे. इतकंच नव्हे तर तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीही त्रिशाने विजय यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.

Follow Us