TVK Vijay-Trisha : विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री बनण्याआधी अभिनेत्री त्रिशा कृष्णनची उपरोधिक पोस्ट व्हायरल, तिने कोणाला सुनावलं?
TVK Vijay-Trisha : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन चार दिवस झालेत. पण अजून सरकार स्थापनेचा पेच सुटत नाहीय. अभिनेता थलपती विजयवर जनतेने सर्वाधिक विश्वास दाखवला आहे. त्याचा TVK तामिळनाडूतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

TVK ला पूर्ण बहुमत मिळालेलं नाही. 234 सदस्यांच्या तामिळनाडू विधानसभेत बहुमताचा आकडा 118 आहे. त्यासाठी TVK पक्षाला 11 जागा कमी पडत आहेत. विजयच्या TVK पक्षाकडून बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. पण अजून यश मिळालेलं नाही. विजय आज शपथ घेणार असं बोललं जात होतं. पण पूर्ण बहुमत नसल्याने राज्यपालांकडून अजून हिरवा कंदिल मिळालेला नाही.

विजयने दोनवेळा राज्यपालांची भेट घेतली आहे. विजयचे लाखो चाहते त्याला तामिळनाडूचा पुढता मुख्यमंत्री म्हणून पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या दरम्यान विजयच खासगी आयुष्य सुद्धा चर्चेत आहे. विजय आणि त्रिशा कृष्णन यांच्या मैत्रीची भरपूर चर्चा आहे.

आता अभिनेत्रीची एक क्रिप्टिक उपरोधिक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्रिशाने इन्स्टावर एक फोटो शेअर केला. त्यावर blah blah, Yadda ya आणि dah dah असे शब्द आहेत. पाठिमागे बोलणाऱ्यांसाठी, गॉसिप करणाऱ्यांसाठी हे शब्द खासकरुन असल्याचं बोललं जात आहे.

IYKYK असही कॅप्शनमध्ये लिहिलय. पर्सनल लाइफबद्दल सुरु असलेल्या अफवांवर त्रिशाकडून हे उत्तर असल्याचं सोशल मिडिया युजर्सचं म्हणणं आहे.

विजयसोबत त्रिशा कृष्णनचं नाव जोडलं जातय. त्या दरम्यान ही पोस्ट समोर आली आहे. नुकतचं एका पॉडकास्टमध्ये राखी सावंतने विजय आणि त्रिशाच्या नात्याबद्दल कमेंट केली. 'मला वाटतं त्यांनी लग्न करावं. विजय आणि त्रिशाने लग्न करावं. मी मेहंदीसाठी जाईन'