गायत्री दातारने दाखवला होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा; कोण आहे तिचा जोडीदार?

'तुला पाहते रे' फेम अभिनेत्री गायत्री दातारने अखेर तिच्या होणाऱ्या पतीची सर्व चाहत्यांना ओळख करून दिली आहे. त्याच्यासोबतचा रोमँटिक व्हिडीओ पोस्ट करत गायत्रीने प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

| Updated on: Dec 26, 2025 | 8:44 AM
1 / 5
मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू आहे. प्राजक्ता गायकवाड, पूजा बिरारी, जय दुधाणे या सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधत आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली. आता 'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गायत्री दातारने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

2 / 5
काही दिवसांपूर्वी गायत्रीने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत तिच्या जोडीदाराविषयीचा खुलासा केला होता. त्याचसोबत हातातील साखरपुड्याची अंगठीसुद्धा तिने दाखवली. परंतु या फोटोंमध्ये त्याचा चेहरा दिसत नव्हता. त्यामुळे त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप आतूर झाले होते.

3 / 5
अखेर ख्रिसमसच्या दिवशी गायत्रीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याची सर्व चाहत्यांना ओळख करून दिली आहे. 'माझ्या आयुष्यातील सांताला भेटा' असं कॅप्शन देत तिने खास व्हिडीओ पोस्ट केला. गायत्रीच्या जोडीदाराचं नाव श्रीकांत चवरे असं आहे.

4 / 5
श्रीकांतचं इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट आहे. त्याने आयआयटी बॉम्बेमधून शिक्षण पूर्ण केल्याचं बायोमध्ये लिहिलंय. त्याचसोबत तो ड्रोन फोटोग्राफरसुद्धा आहे. श्रीकांतला फिरण्याची आणि फोटोग्राफीची खूप आवड आहे.

5 / 5
गायत्रीने होणाऱ्या नवऱ्याची ओळख करून दिल्यानंतर अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. धनश्री काडगांवकर, रेश्मा शिंदे, प्रीतम कागणे यांसारख्या सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.