AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेहुणीवर होती वाकडी नजर,जावयाला मारले आणि घराजवळ पुरले, पत्नी-सासूसह चौघांना अटक

..तो सासुरवाडीत घरजावई म्हणून राहात होता. मेहुणीशी शरीर संबंध ठेवण्याचा त्याचा इरादा होता. त्या दिवशी अति झाले आणि सासूने जावयाला चोपले. यात हातापायीत जावयाला सगळ्यांनी मिळून ठार केले आणि घराजवळ पुरले...

मेहुणीवर होती वाकडी नजर,जावयाला मारले आणि घराजवळ पुरले, पत्नी-सासूसह चौघांना अटक
Murder due to immoral relationship
| Updated on: May 23, 2026 | 8:49 PM
Share

बिहारच्या जमुई येथील नात्यालाच काळीमा फासण्याचा प्रकार घडला आहे. मोहनपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काला गावात सासुरवाडीत राहणारे ३५ वर्षीय जावई जितेंद्र पंडित याची घरगुती भांडणातून सासू आणि मेहुण्याने हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.मारहाणीत जावयाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाला घराच्या पाठी तीन फूट खोल खड्ड्यात दफन केले. एवढेच नव्हे तर मृतदेहाचे विघटन लवकर होण्यासाठी खड्ड्यात सुमारे १५ पाकिट मीठ देखील घातले. ही घटना उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी गुप्त माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी घटनास्थळी टीम पोहचली. त्यानंतर खड्डा खणून या मृतदेहाला बाहेर काढण्यात आला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यास पोस्टमार्टेमसाठी जमुई सदर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. पोलिसांना या प्रकरणात कारवाई करत मृताची पत्नी, सासू, मेहुणी आणि मेहुणा यांना अटक केली आहे. सर्वांची आता चौकशी केली जात आहे.

जितेंद्र पंडित हा झारखंड येथील मधुपूर भागाचा राहणारा होता. सुमारे १० वर्षांपूर्वी त्याचे लग्न काला गाव येथील रहिवासी रजनी हिच्याशी झाली होती. लग्नाच्या दोन ते तीन महिन्यानंतर तेथेच घरजावई म्हणून सासरवाडीला राहू लागला. त्याला दोन लहान मुले आहे. ज्यात पाच वर्षांची मुलगी आणि दोन वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.

कौटुंबिक वादातून हत्या, मृतदेहाची विल्हेवाट लावली

माहितीनुसार बुधवारी कुटुंबात कोणत्या तरी गोष्टीवरुन वाद झाला. गावकऱ्यांनी सांगितले की कुटुंबात भांडणात शब्दाला शब्द वाढत जाऊन मारहाण झाली. ज्यात जितेंद्र गंभीर रुपाने जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. आरोप आहे की यानंतर कुटुंबाने पोलिसांना न बोलवता मृतदेहाला घराच्या पाठीमागे खड्डा खणून पुरले.

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र याला दारुचे व्यसन होते त्यामुळे घरात सारखे वाद होत होते. काही लोकांनी त्याच्यावर घरातील महिलांशी अनैतिक संबंध ठेवल्याचाही आरोप लावला आहे. मात्र, या आरोपांना दुजोरा मिळालेला नाही. मृताची पत्नी रजनी यांनी सांगितले की तिचा पती रोज दारु पिऊन मारहाण करायचा. घटनेच्या दिवशी तो नेहमीप्रमाणे नशेत होता. छतावरुन कोसळून त्याचा मृत्यू झाला. पत्नीने कुटुंबातील महिलांशी तिच्या नवऱ्याचे संबंध असल्याचा आरोपांचा इन्कार केला.

पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर कारण कळणार

जितेंद्र पंडित याची आई मालती देवी यांनी या घटनेला हत्या असल्याचे सांगत आपला मुलगा गेल्या १० वर्षांपासून सासुरवाडीत रहात होता आणि कुटुंबाचे सर्वकाही सामान्यपणे सुरळीत सुरु होते. कौटुंबिक वादात आपल्या मुलाची हत्या केल्याचा आरोप मालती देवी यांनी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र पंडित याचा मेहुणीवर डोळा होता. ज्याचा विरोध त्याच्या सासूने केला. यामुळे घरात भांडणे झाली आणि चिडलेल्या जितेंद्र याने सासूचे एक बोट दाताने चावत तिला गंभीर जखमी केले. जितेंद्र दोनदा तुरुंगातही जाऊन आला होता. पोलिस अधिकारी सतीश सुमन यांनी सांगितले की घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. फोरेन्सिक पुरावे जमा केले जात असून पोस्टमार्टेम रिपोर्टची वाट पाहिली जात आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ