AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवराज मोटेगावकर याचा नवा कारनामा, पुण्यातील वारजे भागात कोट्यवधीची जागा

नीट पेपर फुट प्रकरणात सीबीआयने अटक केलेल्या आरसीसी कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर याच्या मालमत्ते संदर्भात रोज नवनव्या घडामोडी उघड होत आहेत.

शिवराज मोटेगावकर याचा नवा कारनामा, पुण्यातील वारजे भागात कोट्यवधीची जागा
Shivraj Motegaonkar land in pune
| Updated on: May 23, 2026 | 10:06 PM
Share

आरसीसी कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांनी पुण्यातील हवेली तालुक्यातील वारजे भागात ५१ गुंठे घेतली असल्याचे उघडकीस आले आहे. ही जागा अगदी मोक्याच्या ठिकाणी असून तिचे बाजारमुल्य देखील जास्त आहे. ही जमीन सामाजिक संस्थेच्या नावाने विकत घेतली असून या जागेच्या फलकावर मोटेगावकर याचे नाव काळ्या रंगाने झाकले असल्याचेही उघडकीस आले आहे. शिवराज मोटेगावकर याच्याकडे इतकी माया आली कुठून असा सवाल केला जात आहे.

राजर्षी शाहु महाराज बहुउद्देशीय सामाजिक विकास, महाराष्ट्र लातूर, याच भागात त्याचे दोन प्लॉट आहेत. ५१ गुंठे जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच भागात महापालिकेचा रस्ता आहे. हा रस्ता देखील शिवराज मोटेगावकर याला आपल्या ताब्यात घ्यायचा होता. मात्र, येथील नागरिकांनी आंदोलन करुन हा त्याचा डाव हाणून पाडल्याची येथील स्थानिकांनी सांगितले आहे. दोन प्लॉटमधील हा महापालिकेचा रस्ता त्याने हडपण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सामाजिक भान असलेल्या नागरिकांना विरोध केल्याने हा रस्ता वाचल्याचे म्हटले जात आहे.शिवराज मोटेगावकर याच्याकडे इतकी कोट्यवधी रुपायांची जमीन घेण्यासाठी आलेला पैसा हा कोचिंग क्लासेसच्या माध्यमातूनच कमावला की पेपर फुटीतून हा पैसा मिळाला असा सवाल केला जात आहे.

अनधिकृत बांधकामाला नोटिस दिली

नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर येथील आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर याला सीबीआयने नुकतीच अटक केली आहे. या प्रकरणात एकूण ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. मोटेगावकर यांच्या मेडीकल कॉलेज किंवा शैक्षणिक संकुलासाठी लातूरच्या खोपेगाव शिवारात उभारलेल्या इमारतीच्या बांधकामावरुनही प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. परवाना न घेताचे हे अनधिकृत बांधकाम उभारल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात मोटेगावकर याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे सुतोवाच केले आहेत.जिल्हा प्रशासनाने मोटेगावकर यांना या बांधकाम प्रकरणात कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. या बांधकामाचा परवाना आणि इतर कागदपत्रे सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ