
रुबिना दिलैक हे टीव्ही मालिकेमधील अत्यंत मोठे नाव आहे. रुबिना दिलैक हिने आपल्या करिअरमध्ये अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

विशेष म्हणजे रुबिना दिलैक हिचा चाहता वर्गही अत्यंत मोठा आहे. रुबिना दिलैक ही बिग बाॅस 14 ची विजेती देखील आहे. बिग बाॅसमध्ये पतीसोबत रुबिना सहभागी झाली होती.

गेल्या काही दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून रुबिना दिलैक ही दूर आहे. चाहते सतत तिच्या पुनरागमनाची वाट पाहताना दिसत होते. शेवटी आता चाहत्यांची आतुरताना संपली आहे.

रुबिना दिलैक ही धमाकेदार पद्धतीने पुनरागमन करणार आहे. गायक आणि अभिनेता इंदर चहल यांच्यासोबत धमाल करताना रुबिना दिलैक ही दिसणार आहे.

इंदर चहल याच्यासोबत रुबिना दिलैक ही पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे याबद्दलची माहिती रुबिना दिलैक हिने चाहत्यांना दिलीये.