प्रचंड सुंदर असल्यामुळे या अभिनेत्रीला मिळत नव्हते काम, आता रोहित शेट्टीच्या शोमध्ये झळकणार

इंडस्ट्रीमधील एक अशी अभिनेत्री जिला प्रचंड सुंदर असल्यामुळे करावा लागला रिजेक्शनचा सामना. आता टीव्ही क्षेत्रात करतेय काम. कोण आहे ती अभिनेत्री?

| Updated on: May 08, 2026 | 12:22 PM
1 / 5
ग्लॅमरच्या दुनियेत सुंदर दिसण्यासाठी कलाकार मोठ्या प्रमाणात मेहनत घेतात. पण कधी कधी हीच सुंदरता एखाद्यासाठी अडथळाही ठरू शकते. टीव्ही अभिनेत्री शगुन शर्मा हिच्यासोबतही असंच काहीसं घडलं.

ग्लॅमरच्या दुनियेत सुंदर दिसण्यासाठी कलाकार मोठ्या प्रमाणात मेहनत घेतात. पण कधी कधी हीच सुंदरता एखाद्यासाठी अडथळाही ठरू शकते. टीव्ही अभिनेत्री शगुन शर्मा हिच्यासोबतही असंच काहीसं घडलं.

2 / 5

अभिनयाची क्षमता असूनही केवळ खूप गोरी असल्यामुळे तिला अनेकदा रिजेक्शनचा सामना करावा लागला होता. मात्र आज ती टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा बनली असून लवकरच खतरों के खिलाड़ी च्या 15 व्या पर्वात धाडसी स्टंट करताना दिसणार आहे.

3 / 5

शगुन शर्मा सध्या क्योंकि सास भी कभी बहू थी 2 या मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेत ती ‘परी विरानी’ ही भूमिका साकारत आहे. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता ती प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या लोकप्रिय स्टंट शोमध्ये सहभागी होणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

4 / 5

एका जुन्या मुलाखतीत शगुनने सांगितले होते की, तिला अनेक ऑडिशनमध्ये नाकारण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे तिच्या अभिनयात कमतरता नसून ती खूप गोरी दिसते, त्यामुळे ती काही भूमिकांसाठी योग्य वाटत नाही असे कारण तिला दिले जायचे.

5 / 5

अनेक रिजेक्शननंतरही शगुनने हार मानली नाही. मेहनत आणि सातत्याच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. शगुन शर्मा ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us