श्वेता तिवारीसाठी वय फक्त एक आकडा, रॉयल साडीतील फोटो पाहून म्हणाल…
अभिनेत्री श्वेता तिवारी हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक फार आवडला आहे. पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्रीने हटके फोटोशूट केलं आहे. सध्या सर्वत्र श्वेता फोटोंची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारी गेल्या अनेक वर्षांपासून टीव्ही विश्वास सक्रिय आहे. अभिनेत्रीने आता पर्यंत अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये देखील काम केलं. आता अभिनेत्रीने ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पदार्पण केलं आहे. पण तिला खरी ओळख मिळाली ती म्हणजे 'कसोटी जिंदगी की' मालिकेतून...

श्वेता आता तिच्या कोणत्या सिनेमामुळे नाही, रॉयल लूकमुळे चर्चेत आली आहे. श्वेता तिवारीच्या फोटोंची सध्या तुफान चर्चा रंगली आहे. श्वेता फक्त तिच्या भूमिकांसाठीच नाही तर, सौंदर्यामुळे देखील चर्चेत असते.

सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. रॉयल साडीत श्वेता सिंपल लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी कायम सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

वयाच्या 44 व्या वर्षी देखील श्वेताचं सौंदर्य कमी झालेलं नाही. आजही अभिनेत्री वेगवेगळ्या लूकमध्ये फोटोशूट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आजही चाहते अभिनेत्रीच्या लूकवर फिदा आहेत.

सोशल मीडियावर श्वेता कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. श्वेता खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. आज श्वेता दोन मुलांचा सांभाळ सिंगल मदर म्हणून करत आहे. मुलांसोबत अभिनेत्रीला अनेकदा स्पॉट देखील करण्यात आलं आहे.