सुंदर अती सुंदर…, गुलाबी साडीत श्वेता तिवारीच्या दिलखेच अदांनी वेधल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो पाहून म्हणाल…
अभिनेत्री श्वेता तिवारी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत तिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज देखील अभिनेत्री कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या श्वेताचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

फक्त टीव्ही नाही सिनेमा आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री श्वेता तिवारी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. चाळीशीत पोहोचली तरी अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

गुलाबी रंगाच्या बनारसी साडीत श्वेता हिने खास फोटोशूट केलं आहे. सध्या सर्वत्र श्वेता हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडलेला आहे... अनेकांनी कमेंट करत श्वेता हिचं कौतुक देखील केलं आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारी टीव्ही विश्वातील अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता अभिनेत्री तिच्या मालिकेमुळे नाही तर, सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री वयाच्या 43 व्या वर्षी देखील चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. श्वेता हिच्या फोटोवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'सुंदर अती सुंदर...', तर अनेकांनी सुंदर अशी कमेंट केली आहे, तर काहींनी 'एव्हरग्रीन सौंदर्य...' अशी कमेंट केली आहे.

श्वेता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.