Photo : कुणाला गावाला तर कुणाला कॉलेजला जायचं होतं… थेट रुग्णालयात पोहोचले; लागोपाठ दोन अपघाताने पालघर हादरले

पालघर जिल्ह्यात आज दोन अपघात झाले आहेत. पहिला अपघात पालघर डेपोच्या बसलाजव्हार-विक्रमगड मार्गावर झाला. दुसरा अपघात हा चौथायची वाडी या बस स्टॉप जवळ झाला. या अपघातात बसचा डायव्हर व कंडक्टर जखमी झाले आहेत. याचे काही फोटो समोर आले आहेत.

| Updated on: Nov 15, 2025 | 3:43 PM
1 / 5
पहिला अपघात जव्हार येथून पालघर डेपोची बस घाटात उतरत असताना समोर येणारी फोर व्हीलर दुसऱ्या वाहनाला ओरटेक करून बस समोर आल्यानेझाला आहे. या अपघातातील प्रवासी सुखरूप आहेत.

2 / 5
अचानक फोर व्हीलर समोर आल्याने डायव्हरने प्रसावधान राखून बस कंट्रोल केली, त्यामुळे बस दरीत कोसळता-कोसळता  आहे. या मार्गांवरून पालघर लोकसभा खासदार डॉ हेमंत सवरा जात होते, त्यांनी खाली उतरून प्रवाशांची विचारपूस केली.

3 / 5
दुसरा अपघात हा जव्हार पासून दोन किलोमीटर चौथायची वाडी या बस स्टॉप जवळ जव्हार-ऐना एसटी बसला झाला. बस रस्त्यांच्या खाली कोसळली आहे, या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

4 / 5
या बसमध्ये आयटीआयचे विद्यार्थी, महाविद्यालय विद्यार्थी आणि इतर प्रवासी प्रवास करत होते, यातील 20 जण जखमी झाले आहे. एका प्रवाशाला जास्त दुखापत झाल्याने नाशिक येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. तर एका विध्यार्थीनीला डहाणू येथे दाखल करण्यात आले आहे

5 / 5
हा अपघात कसा झाला या बाबत डायव्हर सुभाष गावित यांनी सांगितले की, 'गाडी उतारावर असताना आवाज झाला म्हणून मी ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला, मात्र ब्रेक लागला नाही त्यामुळे गाडी एका बाजूने जाऊन कोसळली.' ही बस एका पडक्या घरावर कोसळली आहे, या ठिकाणी कोणी राहत नसल्याने मोठे नुकसान टळले आहे.