ठाकरे गटाचे 5 फुटीर खासदार अडचणीत? अधिवेशनाच्या काही तासाआधीच गेमचेंजर डाव टाकला, थेट घराबाहेर…

डिलिमिटेशन विधेयकावरून ठाकरे गटाचे 5 फुटीर खासदार अडचणीत सापडल्याची चर्चा आहे. अधिवेशनाच्या काही तासाआधीच गेमचेंजर डाव टाकला आहे.

| Edited By: | Updated on: Nov 29, 2026 | 9:57 PM
1 / 6
डिलिमिटेशनवरून देशासहित राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. उद्धव ठाकरेंनी या विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने फुटीर खासदारांना व्हिप जाहीर केला आहे.

डिलिमिटेशनवरून देशासहित राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. उद्धव ठाकरेंनी या विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने फुटीर खासदारांना व्हिप जाहीर केला आहे.

2 / 6

ठाकरे गटाने 9 खासदारांना व्हिप जारी केला आहे. त्यांनी फुटीर खासदारांन देखाील व्हिप जारी केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने फुटीर खासदारांच्या घराबाहेर व्हिप लावला आहे.

3 / 6

ठाकरे गटाने व्हिपचं पत्र थेट सहा फुटीर खासदारांच्या घराबाहेर लावले आहेत. दरवाजाच्या बाजूला दिसेल, अशा जागी व्हिप लाावला आहे. ठाकरेंच्या व्हिपने सहा फुटीर खासदारांची कोंडी होणार असल्याची चर्चा आहे.

4 / 6

उद्धव ठाकरे यांनी डिलिमिटेसन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे, अशा सूचना त्यांनी फुटीर खासदारांना दिल्या आहेत. त्यामुळे ठाकरे गटाच्या व्हिपचं पालन फुटीर खासदार करणार का, यावरून चर्चा सुरू झाली आहे.

5 / 6

डिलिमिटेशन विधेयकाच्या बाजूने संसदेत मतदान करणे म्हणजे ते परिच्छेद 2(1)b नुसार अपात्र ठरतील, असा दावा वकील असीम सरोदे यांनी केला आहे.

6 / 6

वकील असीम सरोदे यांच्या दाव्यानुसार ठाकरेंच्या फुटीर खासदारांचे टेन्शन वाढलं आहे. त्यामुळे अधिवेशनत ठाकरेंचे फुटीर खासदार काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us