‘उदे गं अंबे..’ फेम अभिनेत्री मयुरी कापडणेनं बांधली लग्नगाठ; कोण आहे नवरा?

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'उदे गं अंबे' या मालिकेत भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी कापडणे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाचे फोटो समोर आले असून तिचा नवरा कोण आहे, त्याविषयी जाणून घ्या..

| Updated on: Mar 30, 2026 | 9:56 AM
1 / 5
'उदे गं अंबे' या स्टार प्रवाहवाहिनीवरील गाजलेल्या मालिकेत आदिशक्तीची भूमिका साकारलेली अभिनेत्री मयुरी कापडणे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. 27 मार्च 2026 रोजी मयुरीचा विवाहसोहळा पार पडला.

2 / 5
मयुरीने ठाण्यातील उद्योजक स्वप्नील मराठेशी लग्न केलं आहे. या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी मयुरी आणि स्वप्निल या दोघांनी ऑफ व्हाइट रंगसंगतीचा पोशाख परिधान केला होता.

3 / 5
पुण्याची रहिवासी असलेल्या मयुरीने अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. 'उदे गं अंबे' या मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली. तर मयुरीचा पती स्वप्नील मराठे हा एक यशस्वी उद्योजक आहे.

4 / 5
स्वप्निल हा ठाण्यातील युवान ग्रुपचा सर्वेसर्वा आहे. तो रिअल इस्टेट, चित्रपट निर्मिती आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहे. त्याच्या 'युवान फाऊंडेशन'मार्फत गरीब अनाथ मुलांच्या शिक्षणाचा खर्च केला जातो.

5 / 5
मयुरीने 'जाऊ नको दूर.. नाना', 'उदे गं अंबे', 'तेरी लाडली मैं' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर मयुरी आणि स्वप्निल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Follow Us