
सध्या देशभरात कोरोनानं डोकं वर काढलंय. अशा परिस्थितीत आपल्या आयोग्ययंत्रणेतील डॉक्टर, परिचारिका दिवस-रात्र एक करत, स्वत:चा जीव धोक्यात टाकत नागरिकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.

देशातीलच नाही तर जगभरातील परिचारिका आणि आरोग्यसेवकांना सलाम करणारा त्यांचे कष्ट लोकांसमोर मांडणारे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

केरळमध्ये हे भावनिक फोटोशूट करण्यात आलं आहे. तर विष्णु संतोष (Vishnu Santhosh) या फोटोग्राफरने हे फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत.

कोरोनाचं हे संकट देशावरच नाही तर संपूर्ण जगावर आहे. हे या फोटोतून दाखवण्यात आलं आहे.

सध्या हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.