
कोरोनामुळे सध्या थिएटर्स बंद आहेत. त्यामुळे आता ओटीटीवर सगळे चित्रपट रिलीज होत आहेत. दरम्यान सलमान खानलाही त्याचा ‘राधे’ चित्रपट ओटीटीवर रिलीज करावा लागला. मात्र आज आम्ही तुमच्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्वोत्कृष्ट कलाकाराच्या बालपणातील सुंदर फोटो घेऊन आलो आहोत. यामध्ये 20 ते 25 वर्षांपूर्वी हे तुमचे लाडके कलाकार कसे दिसत होते हे तुम्ही पाहू शकणार आहात.

सुमीत व्यास (Sumeet Vyas) आज जितका गोंडस आहे. तो बालपणातही तितकाच गोंडस होता.

विक्रांत मैसी (Vikrant Massey) यापूर्वीही स्टाईलमध्ये राहायचा. आणि आताही तो स्टाईलमध्ये राहतो. या अभिनेत्यानं अतिशय कमी वेळात आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे.

श्वेता त्रिपाठी शर्मा (Shweta Tripathi Sharma) स्वत: एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिनं काम कमी केलं आहे. मात्र जेव्हा जेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा तिच्या अभिनयानं सर्वांचं मन जिंकते. तिनं काही दिवसांपूर्वी शाळेतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

अभिनेता मनोज बाजपेयींचा (Manoj Bajpayee) हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा ते दिल्लीहून स्ट्रगल करत मुंबईला आले होते. मात्र आज ते पूर्णपणे बदलले आहेत, आज ते स्टाइलिश आहेत.

पंकज त्रिपाठींची (Pankaj Tripathi) स्टाईल अनोखी आहे. त्यांचे हे फोटो गावचे शेतात काम करत असतानाचे आहेत. 16 वर्षांपूर्वी पंकज आपल्या पत्नीसह अभिनेता होण्यासाठी मुंबईला पोहोचले होते, आज त्यांच्याकडे सर्व काही आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी

टीव्हीएफ मालिकांमुळे प्रसिद्ध झालेला अभिनेता जितेंद्र कुमार (Jitendra Kumar) याला सगळेच ओळखतात. त्यानं सुद्धा मुंबईत खूप संघर्ष केलाय.