
आनेकजण कठीण परिस्थितीत न डगमगता कठोर परिश्रमाच्या जीवावर मोठं यश संपादन करतात. काही लोक तर जवळ पैसे नसूनदेखील न खचता कोट्यवधीचं साम्राज्य उभ करताना पाहायला मिळतात. सध्या अशाच एका 30 वर्षीय तरुणाची सगळीकडे चर्चा होत आहे. या तरुणाने वर्षाला तब्बल 3 कोटींची उलाढाल करणारी एक कंपनी उभी केली आहे.

या तरुणाचे नाव स्वाधीन अस्मल असे असून ते मुळचे उत्तर प्रदेशमधील सुल्तानपूर येथील आहेत. त्यांचे वडील शेतकरी होती. वडील शेती करत असल्यामुळे त्यांची हलाखीची परिस्थिती होती. परंतू हार न मानात सुरुवातीला एक रुपयाही जवळ नसताना त्यांनी त्यांचे प्रयत्न चालूच ठेवले. आजा स्वाधीन सस्मल यांची कंपनी एका वर्षात तीन कोटींची उलाढाल करते.

सुरुवातीच्या काळात शिक्षण घेताना स्वाधीन छोटी-मोठी कामे करायचे. यातून त्यांनी शिक्षण घेतले तसेच कुटुंबाला आर्थिक मदत केली. सुल्तानपूर जिल्ह्यात असताना त्यांनी वे सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी चालू केली. ही कंपनी चालू केल्यानंतर त्यांचे सुरुवातीचे दिवस फारच कठीण होते.

मात्र कुठेही न डगमडता त्यांनी आपले काम चालूच ठेवले. आज ही कंपनी शिक्षण, प्रशिक्षण, सामाजकार्य या क्षेत्रात नावारुपाला आली आहे. शेतकऱ्याचा मुलगा ते एका कंपनीचा सीईओ असा स्वाधीन यांचा प्रवास आहे.

आज स्वाधीन यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत. ते एक मोटीवेशनल स्पीकर म्हणूनही ओळखले जातात. आज त्यांची ही कंपनी चांगले काम करत असून त्यांचे हे काम अनेकांसाठी प्रेरणा ठरले आहे.