Uric Acid problem: सांधेदुखीला कारण नॉनव्हेज?, रेड मीटने युरिक एसिडची पातळी वाढते, जाणून घ्या…

युरिक ॲसिडची पातळी वाढल्याने सांधेदुखी वाढू शकते. जर कोणाला सांधेदुखीचा त्रास असेल तर त्यांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो.रेड मीट खाल्ल्याने खरंच युरिक ॲसिडची पातळी वाढते का?

| Updated on: Aug 25, 2026 | 10:23 PM
1 / 6
 रेड मीट खाण्याचा शौक असलेल्या लोकांना युरिक एसिड वाढण्याचा त्रास होत असतो. ज्या पदार्थात प्युरिन जास्त असते. त्याने शरीरातील युरिक एसिडची पातळी वाढण्याची शक्यता असते. डॉक्टरांच्या मते युरिक एसिडवर काय उपाय असतो, ते जाणून घेऊयात...

रेड मीट खाण्याचा शौक असलेल्या लोकांना युरिक एसिड वाढण्याचा त्रास होत असतो. ज्या पदार्थात प्युरिन जास्त असते. त्याने शरीरातील युरिक एसिडची पातळी वाढण्याची शक्यता असते. डॉक्टरांच्या मते युरिक एसिडवर काय उपाय असतो, ते जाणून घेऊयात...

2 / 6

युरिक एसिडचे तयार होणे - युरिक एसिड आपल्या शरीरात होणारे एक नॅचरल केमिकल आहे. जेव्हा किडनी याला कमी बाहेर टाकते तेव्हा सांध्यातील वेदना वाढू लागतात. रेड मीट, शुगरी फूड्स, लठ्ठपणा, इन्सुलिन रेजिस्टन्स आणि शरीरातील पाण्याच्या कमतरतेने युरिक एसिडची पातळी वाढते.

3 / 6

नोए़डा येथील यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ.प्रखर गर्ग यांच्या मते रेड मीडचे अधिक सेवन काही लोकांमध्ये युरिक एसिड वाढण्याचे कारण बनू शकते. कारण खास करुन रेड आणि ऑर्गन मीटमध्ये प्युरिनचे प्रमाण जास्त असते.

4 / 6

यूरिक एसिडचे वाढणे- शरीरात प्युरिनच्या विघटनाने युरिक एसिड वाढते. याचा पातळी सतत वाढत राहिली तर सांध्यात क्रिस्टलच्या रुपात ते जमा होऊन संधीवाता सारखी समस्या निर्माण होते. केवळ मीट खाल्ल्याने युरिक एसिड वाढण्याचे एकमात्र कारण नाही.

5 / 6

यूरिक एसिड वाढण्याची इतर कारणे - लठ्ठपणा, मद्याचे सेवन, कमी पाणी पिणे, किडनीची कार्यक्षमता आणि काही औषधांच्या कारणाने देखील युरिक एसिड वाढते. युरिक एसिड जास्त वाढले तर पायांची बोटे आणि मनगटात तीव्र वेदना होतात.

6 / 6

कोणत्या गोष्टीची काळजी घ्या - यामुळे मर्यादित प्रमाणात मीटचे सेवन करावे, पर्याप्त पाणी प्यावे आणि डाएटमध्ये भाज्या, फळे आणि भरड धान्याचा समावेश करावा. ज्या लोकांना आधीच युरिक एसिड जास्त आहे.त्यांना डॉक्टर वा डायटिशियनच्या सल्ल्यानुसार प्युरीन युक्त पदार्थांचे मर्यादित सेवन करावे

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us